८० देशातील ५०,००० स्पर्धकात महाराष्ट्राची २३ वर्षाची ऐश्वर्या श्रीधर ठरली “वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर”

५०,००० स्पर्धकाची स्पर्धा आणि त्यामध्ये फक्त २३ व्या वर्षी पुरस्कार जिंकणे साधीसोपी गोष्ट नाही. परंतु हे शक्य केले आहे भारताच्या ऐश्वर्या श्रीधर हिने आणि विशेष म्हणजे तिने हा फोटो महाराष्ट्रात काढलेला आहे. महाराष्ट्रातील फोटो जागतिक पातळीवर सर्वत्र बातम्या मध्ये झळकताना दिसत आहे. या स्पर्धेकरिता ८० देशातून ५०,००० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेचे हे ५६ वर वर्ष आहे. ऐश्वर्याचा फोटो सर्वात जास्त बघितल्या गेला आणि Behaviour-Invertebrates या कैटीगिरी अंतर्गत तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या फोटोला “Light of Passion” हे नाव देण्यात आले आहे.

हा फोटो महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ट्रेक मध्ये तिने काढला होता. आकाशातील तारे आणि झाडावर असणारे काजवे या फोटोमध्ये दाखविण्यात आले आहे. रात्रीच्या वेळेस काजव्यामुळे झाडाला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. पुरस्कार जिंकलेला फोटो तुम्ही खाली बघू शकता.

ऐश्वर्या मूळ महराष्ट्रातील पनवेल येथील आहे. ती लेखक, फोटोग्राफर व फिल्ममेकर आहे, वयाच्या १२व्या वर्षापासून तिने फोटोग्राफीचे धडे घेण्यास सुरवात केली. वडीलांना ट्रेक व फोटोग्राफीची आवड असल्याने तिला लहानपणी वडील बाहेर घेऊन जात असे. तेव्हापासून तिला हा छंद लागला व तिने यामध्ये करीयर करण्याचे ठरविले.

प्रिन्सेस डीयाना फाउंडेशन कडून तिला मागील वर्षी देखील पुरस्कार देण्यात आला होता. सर्व स्तरावरून तिच्या या कामगिरीसाठी स्तुती करण्यात येत आहे. फार कमी वयात यशाचा मोठा टप्पा गाठणारे कमी लोक असतात. त्यापैकी एक ऐश्वर्या आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *