सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो हाथरस पीडितेचा नाहीये, वाचा सत्य..

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. माहितीनुसार यूपीच्या हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. सोमवारी तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला उपचारासाठी दिल्लीला आणलं. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यूपी सरकारने पीडितेच्या कुटूंबासाठी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

दरम्यान या घटनेतील पीडितेच्या म्हणून एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हाथरस प्रकरणातील पीडिताला न्याय देण्याची मागणी करीत हा व्हायरल फोटो पोस्ट केला आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या फोटोची सत्यता तपासली असता हा जुना फोटो असल्याचे समोर आले आहे. आणि तो पीडित मुलीचा नसून दुसऱ्याच एका मुलीचा असल्याचे समोर आले आहे. फॅक्ट क्रेसेंडो या वेबसाईटने केलेल्या पडताळणीत हा फोटो अजय जीतू यादव नामक व्यक्तीच्या बहिणीचा असल्याचे समोर आले आहे.

या व्यक्तीने स्वतः हा फोटो हाथरस पीडितेचा म्हणून शेअर करू नका असे आव्हान फेसबुकवर पोस्ट करून केले आहे. अजयच्या बहिणीचे 2018 मधेच निधन झाले होते. चंदीगड मधील का रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी डॉक्टरवर कारवाईसाठी हा फोटो घेऊन मोहीम चालवण्यात आली होती.

अजयच्या बहिणीवर चंदिगड येथील लँडमार्क हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली होती. पण ती त्यानंतर शुद्धिवरच आली नाही आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे फोटो देखील 24 जुलै 2018 रोजी अजयने पोस्ट केले होते. या पोस्टमध्ये तिचा सध्या व्हायरल होत असलेला फोटो देखील आहे. सर्वाना नम्र आवाहन आहे कि हा फोटो हाथरस पीडितेचा म्हणून शेअर करू नये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *