धोनी आणि महाराष्ट्राचे हे नाते तुम्हाला माहिती आहे का ?

महेंद्रसिंग धोनी यांनी काल आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती घोषित केली. त्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्या वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. धोनी सोबत त्याचा मित्र सुरेश रैनाने देखील निवृत्ती घोषित केली आहे. धोनी यांच्या वर चित्रित झालेल्या बायोपिकमुळे त्यांचा आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश पडला होता. त्याचा संघर्ष सगळ्या जगाला कळला होता. अगदी शून्यातून सुरु झालेला हा प्रवास सर्वोच्च शिखरावर पोहचला होता.

आता बघूया धोनी महाराष्ट्राचे नाते काय आहे ? तर धोनी आणि साक्षी यांची प्रेमकथा महाराष्ट्रातून सुरु झाली होती. धोनीच्या पत्नीचे नाव साक्षी सिंह रावत असे आहे. साक्षी हि औरंगाबाद येथे इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट मध्ये आपले शिक्षण घेत होती. तिच्या कॉलेजच्या बाजूला युसुफ खान यांचे हॉटेल आहे. तिथे ती नेहमी ब्रेकफास्ट आणि लंच करिता जात होती.

धोनी जेव्हा औरंगाबाद येत होता तेव्हा साक्षी त्याला या हॉटेल मध्ये नेहमी घेऊन जात असे. ११ मे २००८ला धोनी दिल्ली वरून कोणाला न सांगता औरंगाबाद येथे गेला. आणि औरंगाबाद येथील रामा इंटरनेशनल हॉटेल मध्ये त्याने मुक्काम केला होता.

१२ मे २००८ साक्षी आणि धोनी दोघे औरंगाबाद येथे ऑटो मध्ये बसून त्यांनी दिवसभर प्रवास केला. या ऑटोचा ड्रायवर सलेह चौष उर्फ डेविड यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. डेविड सध्या औरंगाबाद मध्ये आपली स्वतःची ट्रेव्हल एजन्सी चालवितो. धोनी, साक्षी आणि तिची एक मैत्रीण तिघे औरंगाबाद येथील प्रसिद्ध “बिवी का मकबरा” येथे फिरायला गेले. जवळपास २ तास त्यांनी हा परिसर बघितला.

शहाजहान यांचा नातू आजम शहा यांनी आजोबा पासून प्रेरणा घेत बिवी का मकबरा बांधला आहे. याचा निर्माण १६५१ ते १६६१च्या दरम्यान करण्यात आला होता. याला बनवायला ७ लाख रुपये खर्च आला होता तर ताज महल बनवायला ३.२० कोटी रुपये खर्च झाला होता.

जर औरंगाबाद येथे धोनी आणि साक्षी यांची भेट झाली नसती तर आज काही वेगळ तुम्हाला आज दिसले असते. आपणास हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा. आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *