१ एकर मध्ये पसरला आहे सनी लीयोनीचा बंगला, बघा काय विशेष आहे या बंगल्यामध्ये..

कोरोनाच्या संक्रमन पसरत असल्याने सनी लिओनि भारत सोडून आपल्या अमेरिकेतील बंगल्यात परतली आहे. अमेरिकेतील लॉस एंजिलीस मध्ये सनी लिओनि राहते. तिथे त्यांचा मोठा शानदार बंगला आहे. सनी नेहमी आपल्या बंगल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. परंतु या घरात काय विशेष आहे आज आपण बघूया,

सनी लिओनिचे घर हे लॉस एंजिलीस मधील शर्मन ऑक्स मध्ये आहे. हा भाग प्रसिद्ध बेवर्ली हिल्सला लागून आहे. बेवर्ली हिल्समध्ये हॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेते आणि अभिनेत्री राहतात. सनीने देखील या भागाला लागून घर घेतले आहे. एक एक्कर मध्ये पसरलेले तिचे हे घर आहे.

सनीच्या घरात सर्व सुख सुविधा उपलब्ध आहे. जसे स्विमिंग पूल, जिम आणि सिनेमा बघायला प्रायवेट थिएटर देखील इथे उपलब्ध आहे. घरासमोर मोठा लॉन देखील आहे. सर्वत्र हिरवळ असलेले तिचे हे घर आहे. सनी लिओनिच्या या घरात ५ बेडरूम आहे. आलिशान डायनिंग रूम देखील आहे आणि मुलाला खेळण्यासाठी प्ले एरिया स्वतंत्र तिच्या घरात आहे.

सनी लिओनि आपल्या तीन मुला सोबत आणि नवरा डेनिअल वेबर याच्या सोबत या घरात राहते. २०१७ मध्ये या दाम्पत्यांनी हा बंगला विकत घेतला होता. हॉलीवूड लिहलेला मोठा बोर्ड आपण नेहमी बघतो तो या घरापासून फक्त ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. घरात प्रवेश केल्या बरोबर आपल्याला या घरात गणपतीची मूर्ती दिसणार.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *