रेखाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे सोनिया, एकता कपूरच्या बोल्ड सिनेमात केले आहे काम..

रेखा सदाबहार सौंदर्याची राणी तिचे आयुष्य नेहमी चर्चेत राहिले आहे. रेखा जेवढी प्रसिद्ध आहे तेवढेच तिच्या आयुष्यात आलेले लोक देखील चर्चेत राहिले आहे. रेखाचे प्रेम प्रकरण नेहमी चर्चेत राहिले आहे. रेखाच्या पहिल्या नवरा प्रसिद्ध सिनेस्टार विनोद मेहरा यांची मुलगी आता सिनेमात आली आहे. परंतु तिच्या बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सोनिया मेहराने बॉलीवूड मध्ये पदार्पण केल्यावर तिचे व रेखाचे नाव परत चर्चेत आले.

रेखा आणि विनोद मेहरा यांनी लपून लग्न केले होते. परंतु त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि त्यांच्या परिवाराकडून येणाऱ्या दबावामुळे दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. रेखा सोबत वेगळे झाल्यानंतर विनोद मेहरा यांनी ३ लग्न केले. सोनिया विनोद मेहरा यांच्या तिसऱ्या पत्नीची मुलगी आहे.

सोनिया जेव्हा ४ वर्षाची तेव्हा तिचे वडील विनोद मेहरा यांचे निधन झाले. यानंतर सोनियाचे पालन पोषण तिच्या आजी आजोबाने केले आहे. सोनिया वयाच्या ८ व्या वर्षापासून अभिनयाचे धडे घेत आहे. तिला लंडन एकेडमी ऑफ म्यूजिक एंड ड्रामेटिक आर्ट्स मध्ये अभिनयाकरिता गोल्ड मेडल देखील आहे.

जेव्हा ती १७ वर्षाची झाली तेव्हा ती भारतात परत आली आणि अनुपम खेर यांच्या एक्टिंग स्कूल मध्ये ३ महिन्याचा कोर्स देखील केला आहे. सोनियाने आपल्या करीयरचा पहिला सिनेमा डेब्यू “विक्टोरिया नंबर २०३’ मध्ये काम सोनिया ने आत्ता पर्यत ४ सिनेमात काम केले आहे. तिचा शेवटचा सिनेमा “रागिणी एमएमएस २” हा होता.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *