टीव्हीवर लाइव डीबेट मध्ये शिव्या देणारे जीडी बक्षी आहे तरी कोण ?

काही दिवसा अगोदर टीव्हीवर लाइव डिबेट सुरु होती आणि मुद्दा होता देशातील सीमा, गलवान चीन इत्यादी, चर्चा एवढी गरम झाली कि यामध्ये चर्चा करणाऱ्या एकाने शिव्या दिल्या. ज्यांना शिव्या दिल्या ते होते हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रवक्ता दानिश रिजवान हे होते आणि शिव्या देणारे रिटायर जनरल जीडी बक्षी हे होते.

जीडी बक्षी यांचे पूर्ण नाव गगनदीप बक्षी हे आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये जबलपूर(मध्य प्रदेश) मध्ये झाला. १९७१ ते २००८ पर्यंत त्यांनी भारतीय सैन्यात आपली सेवा दिली. मेजर जनरल या पदावर ते सेवानिवृत्त झाले. हे आर्मीच्या सेवेतील मोठे पद आहे. त्यांची चांगली ओळख व्हायला आणखी दोन किस्से बघूया,

मागील वर्षी पुलवामा मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर जीडी बक्षी चर्चेला होते त्या चर्चेत देखील ते रागात आले आणि लाइव टीव्हीवर शिव्या दिल्या परंतु या वेळेस शिव्या ह्या कश्मीर फुटीरतावादी लोकांना दिल्या होत्या. या वर्षी जानेवरी मध्ये एका कार्यक्रमात ३५-अ वर चर्चा सुरु असताना त्यांनी पाकिस्तानी सैन्याकरिता काही शब्द वापरले आणि हि क्लिप युट्युबवर भयंकर वायरल झाली.

सैन्या मध्ये येण्याचे कारण त्यांनी सांगितले होते कि, १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांचे भाऊ शहीद झाले होते. हे एक मोठे कारण त्यांच्या साठी सैन्यात येण्याचे होते. त्यांच्या वडिलाचे स्वप्न होते कि मुलगा आयएएस व्हायला हवा परंतु भाऊ शहीद झाल्याने त्यांनी सैन्यात जायचे ठरविले. वडील एनडीए मध्ये जाण्याच्या विरोधात होते परंतु त्यांनी घरच्यांना विंनती करून ३ वर्ष एनडीए त्यानंतर १ वर्ष मिल्ट्री एकेडमी आणि नंतर सैन्यात दाखल झाले तब्बल ३७ वर्ष त्यांनी सैन्यात सेवा दिली.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना देशाच्या सीमेवर तैनात करण्यात आले. १९८५ मध्ये पंजाब मध्ये देखील त्यांनी सेवा दिली आहे. कारगिल युध्दात केलेल्या कामगिरी करिता त्यांना विशेष सन्मान मिळाला होता. २००८ मध्ये बक्षी रिटायर झाले आणि आत्तापर्यंत त्यांनी २६ पुस्तके लिहली आहे.

Bose or Gandhi: Who got India her freedom? व Bose: An Indian Samurai : Netaji and the INA : a Military Assessment हे दोन त्यांची प्रसिद्ध पुस्तक आहे. आझाद हिंद सेनेचा त्यांच्या विचारावर मोठा प्रभाव आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *