सीआयडी मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजित उर्फ आदित्य श्रीवास्तव यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की वाचा..

मागील अनेक वर्षापासून सीआयडी मालिका प्रेक्षकाच्या मनावर राज्य करत आहे. एसीपी प्रद्युमन व त्यांची टीम या मालिकेत आपणास दिसते. यामध्ये विविध गुन्ह्याचा शोध घेणारी हि मालिका आहे. एसीपी प्रद्युमन यांचा प्रसिद्ध संवाद “दया कुछ तो गडबड है” म्हटल्यावर दयाच्या मागे दिसणारा व्यक्ती अभिजित म्हणजे इन्स्पेक्टर अभिजित हे आहे. त्यांचे मुळ नाव आदित्य श्रीवास्तव हे आहे.

२१ जुलै १९६८ला अलाहबाद येथे जन्म झालेले आदित्य श्रीवास्तव यांना नाटकात रस होता अनेक नाटकात काम केल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे सिनेमातील करीयर साठी धाव घेतली. १९८९ मध्ये एका नाटकात काम करताना त्यांची मुलाखत शेखर कपूर यांच्या बरोबर झाली. शेखर त्या दिवसात फुलन देवी यांच्या जीवनावर बनलेली ‘बैंडिट क्वीन’ या सिनेमात काम करत होते. तीमंषु धुलिया यांनी या सिनेमात कलाकाराची निवड केली. परंतु आदित्यची निवड स्वतः शेखर कपूर यांनी केली. आदित्य यांचा रोल फुलन देवीचा लग्नाचा नवरा पुत्तीलाल हे होता.

या सिनेमापासून आदित्य यांच्या सिनेजगतातील करीयर सुरु झाले. यानंतर त्यांनी ‘संशोधन’ आणि ‘हज़ार चौरासी की मां’ अश्या छोट्या भूमिका केल्या. परंतु त्यानंतर राम गोपाल वर्मा यांचा सत्या सिनेमात त्यांना मोठा रोल मिळाला. या सिनेमात त्यांनी इस्न्पेक्टर खांडेळकर यांची भूमिका निभावली परंतु या अगोदर त्यांनी काही छोट्या मालिकेत देखील रोल केला आहे.

यानंतर त्यांना अनेक सिनेमात पोलिसाची भूमिका मिळाली परंतु त्यांनी हे रोल स्वीकारले नाही कारण त्यांची ओळख त्यांना निर्माण करायची होती. मणीरत्नम यांच्या दिल से सिनेमात त्यांनी आतंकवाद्याची भूमिका निभावली होती.

मणीरत्नम यांच्या सिनेमा नंतर बी. पी. सिंह यांनी त्याची नवीन मालिका “सी आय डी” करिता ऑफर आली. त्यांना हा रोल घ्यायचा नव्हता कारण रेगुलर टीव्ही शो मुळे सिनेमात काम करायला अडचण निर्माण झाली असती. २६ एपिसोड नंतर त्यांनी हि डील साईन केली. यामुळे त्यांना सिरीयल सेट वर येण्या जाण्याची मुभा मिळाली होती. या दरम्यान ते अनुराग कश्यप यांचा “पांच” सिनेमात काम केले.

सेन्सर मुळे “पांच” हा सिनेमा पडद्यावर येऊ शकला नाही. सर्वप्रथम ते ३९ व्या एपिसोड मध्ये दिसले त्यानंतर १८ वर्षापासून ते सतत या सिरीयल मध्ये काम करत आहे. ए. हुसैन ज़ैदी यांचे पुस्तक ‘ब्लैक फ्राइडे- द ट्रु स्टोरी ऑफ द बॉम्बे बम ब्लास्ट’ अनुराग कश्यप यांनी सिनेमा बनविण्याचे ठरविले. या सिनेमात आतंकवाद्याचा रोल करण्यास नसरुद्दिन शहा तयार नव्हते. त्यानंतर आदित्य ला बादशाह खानचा रोल देण्यात आला.

‘सुपर 30’ या ह्रितिकच्या सिनेमात आदित्यने काम केले आहे. त्यांचा या सिनेमात रोल लल्लन राम या व्यक्तीचा आहे. कोचिंग सेंटर चालवण्याचा रोल लल्लन राम यांचा आहे. नेटफ्लिक्स वर येणारा “रात अकेली” या सिरीज मध्ये आदित्य श्रीवास्तव परत दिसणार आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *