लांब प्रवासात विमानात काम करणारे पायलट व एअर होस्टेस कुठे झोपतात ?

विमानाचा प्रवास अनेकांनी केला असेल परंतु देशा बाहेर जेव्हा विमान जातात, तेव्हा काही काही देशात पोहचायला २,३ दिवस लागत. प्रवासी आपल्या सिटवर झोपतात परंतु विमानात काम करणारे कर्मचारी त्यांना काम करावे लागत असल्याने झोप आवश्यक आहे. आणि सतत प्रवास करत असल्याने विमानात सिटवर झोपणे शक्य नाही. तर ते झोपतात कुठे ?

तर लांब फ्लाईट मध्ये विमानामध्ये पायलट आणि इतर कर्मचारी यांच्या करिता झोपण्याची व्यवस्था करण्यात येते. हि जागा अनेकांना दिसत नाही त्यामुळे अनेकांना हि माहिती नाही. सामान्य लोकांना इथे येण्यास मनाई आहे. एक तर हा भाग फर्स्ट क्लासच्या पुढे असतो किंवा विमानाच्या शेवटी त्यामुळे अनेकांना याविषयी माहिती नाही आहे.

या भागात आवाज कमी येतो आणि एमरजन्सीसाठी फोनची व्यवस्था देखील उपलब्ध असते. काही काही आराम करण्याचे भाग हे टीव्ही, बाथरूम इत्यादी सुविधा उपलब्ध असलेले असतात. सर्वात लांब प्रवास करणारी सेवा हि सिंगापूर एअर लाईनची आहे. हे विमान न थांबता नेवार्क इंटरनैशनल एअरपोर्ट ते चांगी एअर पोर्ट एवढा प्रवास करते. या विमानात ५ बेड, कपड्यासाठी कपाट, आठ जनाची बसायची व्यवस्था, मनोरंजना करिता साहित्य अशा सुविधा आहे.

काही एअर लाईन अमेरीकन एअर ७७७ मध्ये कर्मचाऱ्या करिता टीव्ही आहे. एअर न्यूजीलंड मध्ये २ सिट आरक्षित असतात. आपण खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये बघू शकता कि कश्या प्रकारे विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची झोपण्याची व्यवस्था करण्यात येते.

वरील माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *