भारतातील या सर्वात मोठ्या ठगाने अमिताभचा चित्रपट बिघडवून टाकला होता

कधीकधी जगप्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल त्यांनी कधी विचारही केलेला नसतो. असाच एक प्रसंग अमिताभ बच्चनच्या बाबतीतही घडला होता. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा अमिताभ बच्चनचे फिल्मी करिअर आकाशात भरारी मारत होते.

अमिताभचे चित्रपट एकामागून एक सुपरहिट होत होते. अमिताभला “नटवरलाल” चित्रपटासाठी लीड रोल मिळालेलं होता. चित्रपटाच्या गाण्यापासून शूटिंगला सुरुवात झाली.

मात्र चित्रपटामध्ये खरा ट्विस्ट तर त्यावेळी आला जेव्हा भारतातील सुप्रसिद्ध ठकबाज नटवरलाल याला समजले की चित्रपट जगतात त्याच्या नावावर अमिताभ बच्चनचा अभिनय असणारा चित्रपट बनवला जात आहे. त्यामुळे तो संतापला आणि त्याने आपल्या वकिलाच्या मदतीने चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली.

तुम्हाला गंमत वाटेल भारतातला एवढा मोठा ठक ज्याने ना केवळ भारतातील व्यापारांना आणि उद्योगपतींना उलट विदेशातील सुप्रसिद्ध लोकांना देखील चुना लावला आहे; त्याने या प्रसंगात स्वतःच्या नावावर चित्रपट बनवला जात असल्याने रागावून कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतला.

असो, कोणत्याही पद्धतीने कायदेशीर अडचणीमध्ये पडण्यापासून वाचण्यासाठी चित्रपट रिलीज व्हायच्या काही दिवस आधी चित्रपटाचे नाव बदलून “मिस्टर नटवरलाल” असे ठेवण्यात आले. मात्र चित्रपटाचे नाव बदलल्यानंतरही अडचणी थांबल्या नाहीत.

शेवटी डोकेदुखी नको म्हणून पुन्हा एकदा चित्रपटाचे नाव बदलून त्यात अमिताभ बच्चनचे नाव जोडण्यात आले. अखेरीस या चित्रपटाचे नाव “Amitabh Bachchan In And As Mister Natwarlal” असे ठेवले गेले होते आणि तेच सेन्सॉर प्रमाणपत्रवर लिहिले गेले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *