वयाच्या ३८ व्या वर्षीच ही तरुणी बनली भारतातील सर्वात श्रीमंत महिला

जगातल्या प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये समावेश असणाऱ्या HCL (हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड) या कंपनीचे चेअरमन शिव नादर यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची ३८ वर्षांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा आता HCL ची नवी चेअरमन बनली आहे. रोशनी ही शिव नादर – किरण नादर या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. या निवडीमुळे रोशनी ही देशातील प्रमुख कंपन्यांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला बनली आहे.

रोशनीने तिचे सुरुवातीचे शालेय शिक्षण दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून केले. त्यानंतर तिने Northwestern University, Evanston, Illinois या युनिव्हर्सिटी मधून कम्युनिकेशन विषयात पदवी प्राप्त केली. नंतर तिने २००९ साली CNN अमेरिका न्यूज चॅनेलमध्ये इंटर्नशिप केली.

त्यानंतर तिने लंडनच्या स्काय न्यूज चॅनेलमध्ये प्रोड्युसर म्हणून काम केले. परंतु नंतर वडिलांच्या सांगण्यानुसार तिने तिथली नोकरी सोडली. पुढे तिने Kellogg School of Management येथून एमबीएची पदवी घेतली आणि ती भारतात आली.

भारतात आल्यानंतर रोशनीने HCL कार्पोरेशन जॉईन केले. एका वर्षांनंतर वयाच्या २७ व्या वर्षी रोशनीला HCL टेक्नॉलॉजीच्या संचालक मंडळामध्ये व्हाईस चेअरमन म्हणून स्थान देण्यात आले . तसेच ती HCL कार्पोरेशनची सीईओ देखील बनली. २०१० साली रोशनीने शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केले. शिखर मल्होत्रा ​​हे HCL हेल्थकेअरचे व्हाइस चेअरमन आहेत. रोशनी आणि मल्होत्रा ​​यांना दोन मुले आहेत. अरमान आणि जहां असे या दोन्ही मुलांची नावे आहेत.

रोशनी बनली भारतातील सर्वात श्रीमंत महिला

Hurun Rich List च्या अनुसार HCL च्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर ३६८०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह रोशनी नादर मल्होत्रा ही तरुणी वयाच्या ३८ व्या वर्षीच भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. २०१९ च्या फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनीला ५४ वे स्थान मिळाले होते.

शास्त्रीय संगीत, भटकंती, वाईल्ड लाईफ आणि संवर्धन या कामांमध्ये रोशनीला अत्यंत रस आहे. त्यासाठी २०१८ साली तिने The Habitats Trust”ची स्थापना केली आहे. या ट्रस्टचे उद्देश भारतातील जैवविविधता आणि प्रजातींचे संरक्षण हे आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *