चिट्ठी पाठवून दरोडा टाकणाऱ्या सुलताना डाकूला पकडण्यासाठी ब्रिटनवरुन अधिकारी बोलवले होते

तुम्ही जर गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटाचा पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला सुरुवातीचा एक प्रसंग नक्कीच आठवत असेल. त्यामध्ये शाहिद खान हा पठाण स्वतःला सुलताना डाकू भासवून ब्रिटिशांची धान्याने भरलेली मालगाडी लुटतो.

परंतु कुरेशी कुटुंबियांना हे समजताच ते शाहिद खानला गावाबाहेर हाकलून देतात. या कथानकतल्या सुलताना डाकूबद्दलच्या अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या नाकात दम आणणाऱ्या सुलतानाला पकडण्यासाठी शेवटी ब्रिटनवरुन अधिकारी मागवावे लागले.

कोण होता हा सुलताना डाकू ?

साधारणपणे १२५ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशात जन्मलेला सुलताना वयाच्या सतराव्या वर्षापासूनच छोट्यामोठ्या चोऱ्या करायला लागला. अशाच चोरीच्या प्रकरणात एकदा त्याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुलतानाने नजीबाबाद जवळच्या एका भग्न किल्ल्यात आपला अड्डा बनवला. तिथूनच त्याने आपली टोळी जमवली.

आपल्या विश्वासातील खबऱ्यांचे जाळे पसरवले. त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या बातम्यांच्या आधारे तो दरोड्याची योजना बनवायचा. विशेष म्हणजे सुलताना चिट्ठी पाठवून आधीच पूर्वसूचना द्यायचा आणि मग दरोडा टाकायचा. दरोड्यात मिळालेली लूट तो गोरगरिबांमध्ये वाटायचं. सुलतान केवळ श्रीमंतांना किंवा ब्रिटिशांना लुटायचा. सुलतानाने ब्रिटिश सत्तेच्या नाकात अक्षरश दम आणला.

सुलतानाला पकडण्यासाठी ब्रिटनवरुन अधिकारी मागवले

सुलताना डाकू ब्रिटिशांसाठी दुखणं बनला होता. त्याला पकडण्यासाठी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आधुनिक शास्त्रांनी सुसज्ज असे ३०० सैनिकांचे पथक बनवले. त्यात ५० घोडेस्वारांचे एक पथकही होते. कुमाऊँचे पोलीस आयुक्त पर्सी बिंडहम यांना ही जबाबदारी देण्यात आली परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. शेवटी ब्रिटनवरुन फ्रेडी यंग नावाच्या अनुभवी ब्रिटिश अधिकाऱ्याला बोलावणं धाडण्यात आले. फ्रेडीने भारतात आल्या आल्या सुलतानाच्या सगळ्या दरोड्यांचा अभ्यास केला.

जिम कार्बेट आणि फ्रेडी यंग

सुलतान ब्रिटिशांच्या हातात लागत नसण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे खबऱ्यांचे जाळे आहे हा निष्कर्ष काढला. प्रसिद्ध शिकारी जिम कार्बेटला देखील सुलतानाला पकडण्याचे काम दिले होते असे सांगण्यात येते. शेवटी फ्रेडी यंगने सापळा रचून १४ डिसेंबर १९२३ रोजी सुलताना डाकूला पकडले. तिथून त्याला आग्रा जेलला नेण्यात आले. तिथे त्याच्यावर खटला चालला. सुलतानाला आपल्या मुलाला डाकू बनवयाचवे नव्हते. फ्रेडी यंगनेच सुलतानाच्या मुलाला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. सुलतानाला दोषी मानत त्याला ७ जुलै १९२४ रोजी फा शी देण्यात आली.

सुलतान डाकूच्या लोककथा इतक्या प्रसिद्ध झाल्या की त्याच्यावर अनेक कादंबऱ्या चित्रपट निघाले. हॉलिवूडमध्ये “The Long Devil हा चित्रपट निघाला. बॉलिवूडमध्ये १९५६ आणि १९७२ साली “सुल्ताना डाकू” या नावाचे दोन चित्रपट निघाले, त्यापैकी एका चित्रपटात दारासिंहानी त्याचा रोल केला. “सुलताना डाकू” नावाने अनेक कादंबऱ्या निघाल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *