रितेश-जेनेलियाने केलेला हा ‘संकल्प’ बघून सलाम ठोकाल! बघा व्हिडीओ..

काल देशभरात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला. सध्या जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. या संकटात डॉक्टर आपल्या प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावत आहेत. कालच्या डॉक्टर दिनाला यामुळे जास्त महत्व प्राप्त झाले होते. अनेकांनी डॉक्टरांबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली.

यामध्ये सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देखील सहभाग नोंदवत एक स्तुत्य निर्णय काल जाहीर केला. रितेश देशमुख आणि जेनेलिया लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आले आहेत. त्यात त्यांनी काल शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.

रितेश-जेनेलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रितेश-जेनेलिया यांनी अवयवदानाची माहिती दिली. त्यांनी डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अवयव दान करणे हे खूप चांगले काम मानले जाते. पण आपल्या सर्वाना शरीराचा एवढा मोह असतो कि मरणोत्तर अवयव दान करण्याचा विचार करून पण भीती वाटते. आपल्या देशात स्वखुशीने अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. रितेश आणि जेनेलियाच्या या मोठ्या निर्णयाने जागृती होण्यास मदत होणार आहे.

रितेश-जेनेलिया यांनी म्हटले की,”जेनेलिया आणि मी याबाबत अनेकदा चर्चा केली. अनेकदा विचार केला. पण, दुर्दैवानं आतापर्यंत बोलू शकलो नव्हतो. पण, आज 1 जुलैला आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्याला आयुष्य देणं यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही. तुम्हालाही तसंच वाटत असेल, तर तुम्हीही पुढाकार घ्या आणि अवयव दान करा.”

बघा व्हिडीओ-

दरम्यान रितेश-जेनेलिया यांच्या पुढाकाराचे केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी कौतुक केलं. त्यांनी लिहिलं की,”रितेश-जेनेलिया यांच्यासारखे युवा कलाकार पुढाकार घेऊन अवयव दान करण्याचा निर्णय घेत असल्याचे पाहून चांगलं वाटत आहे. त्यांच्या या पुढाकारानंतर अनेक जण सामाजिक जाण म्हणून पुढाकार घेतील.”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *