भारतीयांना टोमणा मारणाऱ्या चीनच्या सर्वात मोठ्या पेपरला आनंद महिंद्रानी दिले कडक उत्तर!

भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर चीनचा मोठा तिळपापड झाला आहे. चीनने वेगवेगळ्या माध्यमातून याचा प्रत्येय आणून दिला आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केले होते. यावरून चिनी वृत्रपत्रांनी देखील भारतीयांना टोमणे मारले होते. यात आघाडीला होते चीनचे आघाडीचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स.

२ दिवसांपूर्वी चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हू शिजिन (Hu Xijin) यांनी भारतीयांना टोमणा मारला होता. “चीनच्या लोकांनी भारतीय वस्तूंना बॅन करायचं ठरवलं तरी ते करु शकत नाहीत, कारण इकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत…” अशा आशयाचं ट्विट हू शिजिन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केलं होतं. “भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचं काहीतरी असायला हवं…”असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

त्यांनी या ट्विटमधून चीनमध्ये भारतीय वस्तू खूप कमी वापरल्या जातात असं दर्शवलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर भारतातून एक कडक उत्तर दिलं गेलं. हे उत्तर कोण्या सामान्य व्यक्तीने नाही तर महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दिलं.

या संपादकाने चीनमध्ये भारतीय वस्तुंना किंमत नाही असंच एकप्रकारे म्हंटल आहे. याला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी म्हंटले आहे “हे मत कदाचित भारतीय कंपन्यांसाठी सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल…चिथवल्याबद्दल आभार”.

आनंद महिंद्रा यांनी हे शानदार उत्तर देऊन एकप्रकारे भारतात देखील चिनी वस्तू खूप कमी वापरल्या जातील असे सुचवले आहे. आनंद महिंद्रा यांचं हे ट्विट भारतीय नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं असून ७० हजारांहून अधिक जणांनी ते आतापर्यंत लाइक केलं आहे.

भारतीयांची आहे पुढची जबाबदारी-

चीनच्या या संपादकाने जसं ठणकावून सांगितलं कि भारतीय वस्तू चीनमध्ये वापरल्या जात नाहीत. तसंच आता भारतीयांनी चिनी वस्तूंचा वापर करणे हळू हळू कमी करणे गरजेचे आहे. भारतीयांनी स्वतःहून चिनी वस्तूंचा वापर कमी करत बंद करणे हि भारतीयांची जबाबदारी आहे. तेव्हाच आनंद महिंद्रा यांनी सांगितलेले हे शब्द खरे ठरतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *