कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या जवानांसाठी आर्मी किंवा सरकार “शहीद” हा शब्द का वापरत नाही ?

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरचा तणाव वाढला आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार मारहाण झाली. त्यामध्ये भारताच्या २० सैनिकांनी देशासाठी आपला जीव गमावला आहे. संपूर्ण देश या वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. संपूर्ण देशामध्ये चीनविरोधी लाट आली आहे. काही मीडिया चॅनेल्सनी या सैनिकांच्या मरणाला शहीद किंवा Martyr ऐवजी “K illed” असा शब्दप्रयोग केल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

काय आहे शहीद किंवा Martyr शब्दाचा इतिहास ?

सातव्या शतकात इस्लामच्या उदयानंतर शहीद हा शब्द प्रयोगात आला. कुराणमध्येही या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. शहीद हा अरबी शब्द आहे. सुन्नी इस्लाम धर्मासाठी जीव देणाऱ्या लोकांना शहीद म्हटले जायचे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा शब्द भारतात आला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आला. शहीद शब्दलाच इंग्रजीमध्ये Martyr म्हणतात. ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळात जी व्यक्ती धार्मिक कारणासाठी आपला जीव गमवायचा त्याला Martyr म्हटले जायचे.

देशासाठी मरण पत्करलेल्या सैनिकांसाठी आर्मी किंवा सरकार कोणता शब्द वापरतात ?

भारतीय आर्मी आणि संरक्षण मंत्रालयाने अनेकदा साफ केले आहे की आर्मीच्या नियमावलीमध्ये कुठेही Martyr किंवा शहीद हा शब्द वापरला जात नाही. जर भारतीय सैन्याचा एखादा जवान लढाईमध्ये मारला गेला तर त्यास्तही Battle Casualty म्हटले जाते. एखादा पोलीस मारला गेला तर त्याला Operation Casualty म्हटले जाते.

भारताच्या जवानांच्या बलिदानाची हिंदी भाषेमध्ये बहुतांश वीरगती किंवा सर्वोच्च बलिदान हे शब्दप्रयोग वापरले जातात. मराठीमध्ये हौतात्म्य किंवा हुतात्मा हा शब्द वापरला जातो. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने शहीद किंवा Martyr शब्दप्रयोग केला जात नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *