सुशांतच्या निधनाने दुखी होऊन ‘या गायिकेने’ घेतला बॉलीवूडचे गाणे न गाण्याचा मोठा निर्णय

अभिनेता सुशांतच्या निधनाने सर्वच जण व्यथित झाले आहेत. सर्वाना झालेले दुःख आणि आलेला राग वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूत बॉलीवूडच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालू आहे. बॉलीवूडमध्ये सुशांतला भेदभावाची वागणूक मिळाली. बॉलीवूडमध्ये असलेल्या नातलगांच्या वशिलेबाजीची चर्चा यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

अनेक मोठ्या कलाकारांनी दिग्दर्शकांनी सुशांतच्या निधनानंतर बेधडक मोठे वक्तव्य केले आहेत. यामध्ये सुशांतवर बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे अन्याय झाला याचा पाढाच या सर्वानी वाचला आहे. तर काही मोठ्या दिग्गज कलाकारांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर आरोप देखील करण्यात आले आहेत.

दरम्यान या सर्व वादानंतर दिग्गज गायिका मैथिली ठाकूरने सुशांतच्या निधनाने दुखी होऊन बॉलीवूडमध्ये गाणे न गाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मैथिली ठाकूर हि देखील बिहारची असून तिने लहानपणी पासून संगीत क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. तिचे बालपणच संगीतमय वातावरणात गेले. तिचे वडील रमेश ठाकूर आणि आई पूजा ठाकूर हे देखील संगीत क्षेत्राशी जुडलेले आहेत.

कुटुंबात संगीताची आवड असल्याने मैथिलीला संगीताचा वारसा मिळाला. तिने लहानपणापासूनच संगीताचे धडे गिरवले. मैथिली सुरुवातीला आपल्या युट्युब चॅनेलवर बॉलीवूडचे कव्हर सॉंग गायची. पण आता सुशांतच्या निधनाने व्यथित होऊन तिने आता बॉलीवूडचे गाणे न गाण्याचा निर्णय घेतला आहे. तिने नुकतंच फेसबुक लाईव्ह येऊन हा निर्णय घोषित केला.

सुशांतने बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. पण त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वाना धक्काच बसला आहे. मैथिलीने देखील फेसबुकवर लाईव्ह येऊन आपले दुःख व्यक्त केले. मैथिलीने खूप कमी वयात गायक म्हणून नाव कमावले आहे. ती तिचा भाऊ अयाची आणि ऋषभ सोबत फेसबुक अनु युट्युबच्या माध्यमातून गाणे गाते.

तिने गायलेल्या गाण्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो. तिच्या अनेक व्हिडीओला काही तासांमध्ये करोडो लोकांनी पाहिलं आहे. पण यानंतर मैथिली बॉलीवूडचे गाणे गाताना दिसणार नाहीये.

बघा मैथिलीने पूर्वी गायलेले गाणे-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *