कधीकाळी बॅकस्टेज डान्सर असणारा सुशांत असा बनला होता स्टार

सुशांतसिंग राजपूत आता आपल्यात राहिला नाही. त्याने मुंबईतील राहत्या घरीच गळफास घेतला. ३४ वर्षीय सुशांतने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण असे सांगितले जाते की तो नैराश्यात होता. सुशांतची गणना यशस्वी कलाकारांमध्ये केली जाते. त्याने टेलिव्हिजन मालिकांमधून आपली सुरुवात केली आणि नंतर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले.

दोन्ही ठिकाणी सुशांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव आणि यश संपादन केले. पण अभिनेता होण्यापूर्वी सुशांत एक हुशार विद्यार्थी होता. त्यांनी इंजिनियरिंग प्रवेशासाठी AIEEE परीक्षाही दिली होती, ज्यात त्याला देशात सातवा क्रमांक मिळाला होता. त्याने दिल्ली इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

इंजिनियरिंग करत असतानाच सुशांत श्यामक डावरच्या डान्स ग्रुपद्वारे त्याने अनेक डान्स परफॉर्मन्स सादर केले. २००६ साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐश्वर्या रायने सादरीकरणावेळी सुशांत बॅकग्राऊंड डान्सर होता. त्यानंतर बंटी आणि बबली या चित्रपटात देखील तो अभिषेक बच्चनच्या मागे नाचला. त्यानंतर त्याने इंजिनिअरिंग शिक्षण सोडून दिले आणि मुंबईतील नादिया बब्बरच्या थिएटरसोबत तो काम करु लागला. त्यावेळी त्याने नेस्लेच्या जाहिरातीत कामही केले. त्याचवेळी एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स प्रोडक्शन हाऊसच्या टीमचे लक्ष सुशांतवर गेले.

एकता कपूरने सुशांतला ऑडिशनसाठी बोलावले.त्यांनी “किस देश में है मेरा दिल” मालिकेत त्याला काम दिले. एकताला सुशांतचा अभिनय आवडला. तिने “पवित्र रिश्ता” सीरियलमध्ये त्याला काम दिले. त्यावेळी एकताने त्याला सांगितले होते, “मी तुला स्टार बनवणार.” पवित्र रिश्ता सिरीयल प्रचंड गाजली.

त्यानंतर सुशांतने झलक दिखला जा आणि जरा नचके दिखा या डान्स रियालिटी शोमध्ये काम केले. तिथूनच सुशांतला काय पो छे या चित्रपटात काम मिळाले. सुशांतचा अभिनय लोकांना आवडला. तिथून सुशांतला चित्रपट मिळत गेले आणि त्याने बॉलिवूड स्टार म्हणून नाव कमवले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *