ही आहेत रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या सासरे-जावयातील वादाची कारणे

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता, आता त्यांच्या कालच्या व्हिडीओमुळे सासरे जावयामधील वादाने टोक गाठले आहे. एवढेच नाही आपल्याला त्रास देणे बंद केले नाही तर सायनाईड खाऊन आत्महत्या करण्याची धमकी हर्षवर्धन जाधवांनी दिली आहे.

काय आहेत रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या सासरे-जावयातील वादाची कारणे ?

२६ मार्च २००३ रोजी रावसाहेब दानवेंनी कन्या संजना आणि हर्षवर्धन जाधव यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या ९ व्या महिन्यात त्यांना एक मुलगा झाला. तेव्हापासून दोघांमधील वैवाहिक संबंध ताणले गेले. दोघांमध्ये वाद व्हायला लागले. हर्षवर्धनच्या आईला वृद्धाश्रमात जावे लागले.

२००४ साली विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधवांना ऑर आली होती, पण रावसाहेब दानवेंमुळे ती ऑर हर्षवर्धन जाधवांपर्यंत पोहोचू शकली नव्हती. तरीही आपला खडकेश्वरचा बांगला विकून हर्षवर्धन जाधवांनी निवडणुकीसाठी पैसे उभा केला, मात्र त्यात ते पराभूत झाले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही हर्षवर्धन जाधवांनी मिटमिटा येथील आपली जमीन विकली. रावसाहेब दानवेंनीच ती विकत घेतली. त्यावेळी हर्षवर्धन जाधव आमदार झाले. २०१४ च्या निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव विजयी झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने हर्षवर्धन जाधवांना तिकीट देण्याबाबत सकारात्मक होती, पण रावसाहेब दानवेंनी मध्यस्थी न केल्याने तिकीट मिळू शकले नाही. तेव्हा हर्षवर्धन जाधव अपक्ष उभे राहिले आणि पराभूत झाले. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले. सततच्या पराभवामुळे आणि कौटुंबिक कलहामुळे मागच्याच आठवड्यात आपल्या राजकीय निवृत्तीची त्यांनी घोषणा केली आणि आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून आपली पत्नी संजनाचे नाव घोषित केले. आपला प्रपंच सुरळीत होण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही.

दानवेंनी आपल्यावर अट्रोसिटीचा खोटा गुम्हा दाखल केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. आपले वडील IAS अधिकारी होते आणि दानवे चौथी पास आहेत, तरीही दानवेंनी २०००० कोटी रुपये कमावल्याचे जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमात तुम्ही टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला खाली मातीत बसवता असाही आरोप जाधव यांनी केला आहे. आपण अंतुर किल्ल्यावर जीव द्यायला गेलो होतो, पण आई आणि मुलाचा विचार करुन माघारी आलो असे त्यांनी म्हटले आहे.

काय दिली जाधव यांनी धमकी?

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *