सोनू सूद ना रेल्वेमंत्री ना गृहमंत्री परंतु सरकारपेक्षाही चांगले काम करत आहे, बघा त्याने ठेवलेले तीन पर्याय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित झाला आणि परराज्यातले अनेक मजूर महाराष्ट्रात अडकले. महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्याला जमेल त्या पद्धतीने अशा लोकांची मदत केली. सरकारनेही त्या मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी हालचाली केल्या. काही सेलेब्रिटी लोकांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपले योगदान दिले. पण यामध्ये एक नाव सर्वाधिक चर्चेमध्ये राहिले, ते म्हणजे अभिनेता सोनू सूद ! सिनेमाच्या पडद्यावर व्हिलन असणारा हा अभिनेता वास्तविक जीवनात लोकांसाठी हिरो बनून आला आहे.

सोनू सूदने मजुरांसाठी केली बसेसची व्यवस्था, जेवण आणि पीपीई किट्सही वाटले

महाराष्टार्त अडकलेल्या परराज्यातील मजुरांबाबत सोनूला समजले तेव्हा तो स्वतः रस्त्यावर उतरला. मजूर पायीच आपापल्या गावी निघालेले त्याने पहिले. वृद्ध, महिला, लहान मुलांची अवस्था पाहून त्याचे मन गहिवरले. त्यावेळी कामबंद असल्यामुळे एकाच जागी उभा असणाऱ्या बसचा वापर करुन आपण या लोकांना त्यांच्या गावी पोहोचवू शकतो हा विचार सोनूच्या मनात आला. त्याने आपले जुहू येथे असणारे Love & Latte हॉटेल क्वारंटाईन केंद्र म्हणुन सरकारला देण्याचीही सहमती दाखवली.

त्याने महाराष्ट्रासह कर्नाटक आणि उत्तरप्रदेश राज्य सरकारांची परवानगी घेऊन अडकलेल्या मजुरांसाठी बसेस सुरु केल्या. त्याला प्रत्येक बस फेरीमागे साथ हजार ते दोन लाखांपर्यंतचा खर्च येत आहे. पुढेही उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये बस पाठवण्याचा त्याचा विचार आहे. केवळ बसच नाही तर एक लाखाहून अधिक लोकांना जेवण, डॉक्टरांसाठी पीपीई किट्स अशीही मदत त्याने केली आहे.

सोनू सूदने आपल्यासमोर ठेवले तीन पर्याय

सोनू सूद म्हणतो की, “लॉकडाऊनमध्ये आपल्याला काही काम नाही म्हणून लोक सांगत असतात, पण ते सगळं तुमच्या विचार करण्यावर अवलंबून आहे. मी तर सकाळी ७ वाजल्यापासून व्यस्त असतो. दुपारी १२ वाजल्यापासून माझे कॉल्स चालू होतात. डॉक्टर, नर्स, पोलीस आणि कोविद योद्ध्यांचे काम पाहून मला अभिमान वाटतो.

अशा परिस्थिती आपल्यासमोर तीन पर्याय असतात. पहिला म्हणजे तुम्ही सरकारी नियमांचे पालन करुन घरामध्ये वेळ घालवू शकता, दुसरा मार्ग तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करु शकता आणि तिसरा मार्ग तुम्ही इतरांना मदत करु शकता.”

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *