आगामी काळात येणारे हे १० चित्रपट थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहेत रिलीज

भारतात अद्यापही लॉकडाउन सुरूच असल्या कारणाने थिएटर्स आणि मॉल्स बंदच ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बरेच चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट थेट ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचं ठरवले आहे. त्यापैकी हे दहा चित्रपट…

१) गुलाबो सिताबो : निर्माते शुजित सरकार यांचा हा चित्रपट अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २) लक्ष्मी बॉम्ब : तमिळ चित्रपट “मुनी २” चा रिमेक असणारा अक्षय कुमारअभिनित हा कॉमेडी हॉरर चित्रपट रमजान ईदला रिलीज होणार होता, मात्र आता तो हॉटस्टार डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

३) लुडो : अभिषेक बच्चन आणि राजकुमार राव यांनी अभिनय केलेला या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क देखील अमेझॉन प्राईमने विकत घेतले आहेत. ४) झुंड : अमिताभ बच्चन यांचा हा बहुचर्चित सिनेमा आधी ८ मे यादिवशी प्रदर्शित होणार होता.

परंतु लवकरच तो अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ५) गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल : गुंज सक्सेना यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक नेटाफिक्सवर रिलीज केला जाणार आहे.

६) शकुंतला देवी : मानवी कॅल्क्युलेटर अशी ओळख असणाऱ्या महिलेवर आधारित हा विद्या बालन अभिनित बायोपिक अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होईल. ७) खाली पिली : अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांची भूमिका असणारा हा रोमँटिक ऍक्शन चित्रपट नेटाफिल्क्सवर रिलीज होणार आहे.

८) मिमी : करिती सेनन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर यांच्या भूमिका असणारा सरोगेट मदर विषयावर केंद्रित असणारा हा चित्रपट हॉटस्टार रिलीज करणार आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *