हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिराकडून मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

इस्लाम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना आणि कोरोनामुळे सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन एकाच वेळी आला आहे. सुरुवातीच्या काळात तबलिगी जमातीमधील काही लोकांना कोरोना झाल्याचे तेलंगणात उघड झाल्यानंतर दिल्लीत निजामुद्दीन मार्कजमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम चर्चेत आला.

संचारबंदीच्या काळात एवढी लोक एकत्र येतात कशी असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना सादच्या वक्तव्याने देशभरात वातावरण पेटले. धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण झाले. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने धार्मिक वातावरण पेटवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन गेले आहे.

वैष्णोदेवी मंदिरात मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

देशभरात कोरोनाचाही प्रसार वाढायला लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लोकांना आपापल्या घरी थांबण्याचे आदेश दिले. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याने कोरोनाग्रस्तांना विलगीकरण कक्षात ठेवायला सुरुवात झाली. परंतु रुग्णांची संख्या पाहता सरकारने अनेक खाजगी दवाखाने, हॉटेल्समध्येही क्वारंटाईन सेंटर सुरु केली. हिंदूंचे पवित्र स्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिराचे आशीर्वाद भवनला देखील क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आले. या आशीर्वाद भवनमध्ये अनेक मुस्लिम व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले.

सध्या रमजानचा महिना सुरु आहे आणि आपल्या वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टच्या आशीर्वाद भावांमध्ये अनेक मुस्लिम नागरिक क्वारंटाईन आहेत ही बाब मंदिर प्रशासनाला समजली. रमजान महिन्याच्या अखेरच्या काळात अनेक प्रकारच्या इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते.

मंदिराच्या प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन असणाऱ्या ५०० मुस्लिम बांधवांसाठी इस्लाम धर्मातील पारंपरिक सहरी आणि इफ्तारीचे आयोजन केले गेले. देशभरातील अनेक मुस्लिम बांधवांनी वैष्णोदेवी मंदिर समितीचे कौतुक करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. सर्वांनी धार्मिक सलोखा हीच भारताची खरी ओळख आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *