एकेकाळी ब्युटी क्वीन बनणारी ही तरुणी आज करते आर्मीत ड्युटी

आपण अनेकदा ऐकले असेल की जेव्हा एखादी मॉडेल सौंदर्य स्पर्धा जिंकते, तेव्हा ती बॉलिवूड किंवा कोणत्याही चित्रपटसृष्टीतच आपले करिअर करते. त्यानंतर अशा सौंदर्यवतींच्या मागे चित्रपट, जाहिराती आणि बर्‍याच मालिकांच्या ऑफर चालत येतात. परंतु भारतात अशीही एक मॉडेल आहे जिने हा विचारच बदलून टाकला. या ब्युटी क्वीनने ना कोणता चित्रपट साइन केला, ना मालिका, ना कुठल्या जाहिरातीमध्ये ती दिसणार आहे. कुठलीही चित्रपट इंडस्ट्रीही तिने जॉईन केली नाही. त्याऐवजी तिने देशाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत ती ब्युटी क्वीन ?

लेफ्टनंट गरिमा यादव ! दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी प्राप्त करणारी गरिमा हरियाणाच्या रेवाडी येथील सुर्हेली खेड्यातील रहिवासी आहे.एकेकाळी ब्युटी क्वीन स्पर्धा जिंकणारी ही तरुणी आज भारतीय आर्मीत सेवा देत आहे. सौंदर्यवती स्पर्धा जिंकल्यानंतर चित्रपट, मालिका, जाहिरातीत काम करुन पैसे कमवायचे सोडून ती सैन्यात का रुजू झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो की तिला लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी व्हायचे होते. २०१७ साली तिने मुंबईत पार पडलेल्या इंडियाज मिस चार्मिंग फेस स्पर्धेत २० राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांवर मात करत तिने ही स्पर्धा जिंकली होती.

कशी झाली ती आर्मीत अधिकारी ?

मिस चार्मिंग फेस ऑफ इंडिया बनल्यानंतर गरिमाने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात पाऊल न ठेवता आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरु केला. गरिमाने पहिल्या प्रयत्नातच कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस (संयुक्त संरक्षण सेवा) परीक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीत आपली जागा मिळवली. भारतीय सैन्यात अधिकारी बनण्यापूर्वी तिला इटलीतील एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका सौंदर्य स्पर्धेसाठी बोलावले गेले होते, परंतु तिने या स्पर्धेऐवजी आपल्या देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, ही फार अभिमानाची बाब आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *