तुमचा फोन नंबर ट्रॅक होतोय की नाही ते या कोडद्वारे समजू शकते

आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक स्मार्टफोन बघायला मिळतील. प्रत्येकाकडे त्यांच्या आवडीचे वेगवेगळे स्मार्टफोन असतात. महागडे स्मार्टफोन म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षणच बनत चालले आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळी ऍप्लिकेशन्स बघायला मिळतात. परंतु तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोनची सुरक्षा वापरकर्त्यांच्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. दररोज हॅकर्स वापरकर्त्याच्या स्मार्टफोन ट्रॅक करण्यापासुन ते माहितीची चोरी कारण्यापर्यंतचा प्रयत्न करतात. प्रत्येकवेळी नेटवर्क एरर मुळेच आपल्या स्मार्टफोनला प्रॉब्लेम येत आहे असे नाही, असंही असु शकते की कोणी तुमचा नंबर ट्रॅक करत असेल.

सर्वसाधारणपणे स्मार्टफोन वापरकर्त्यांना समजत नाही की त्यांचा नंबर ट्रॅक केला जात आहे किंवा त्यांचे कॉल अन्यत्र कुठे वाळवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आपला नंबर ट्रॅक होत आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्याला चार अत्यंत महत्वाचे असे सिक्रेट कोड सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला कळू शकेल की तुमचा नंबर ट्रॅक केला जात आहे की नाही. पाहूया कोणते आहेत ते कोड…

१) पहिला कोड *#62# : जेव्हा आपल्याला कोणीतरी कॉल करते तेव्हा अनेकदा त्यांना नंबर नो-सर्व्हिस किंवा उत्तर देत नाही असे सांगण्यात येते. अशावेळी वर दिलेला कोड आपल्या स्मार्टफोनमध्ये डायल करुन एखाद्याने आपला नंबर री-डायरेक्ट (पुनर्निर्देशित) केला आहे की नाही ते तपासू शकता. याशिवाय आपला नंबर ऑपरेटरच्या क्रमांकावर देखील री-डायरेक्ट होऊ शकतो.

२) दुसरा कोड *#21# : हा कोड आपल्या फोनमध्ये डायल करुन आपल्याला सहजपणे कोणी आपले मेसेज, कॉल किंवा डेटा दुसरीकडे वळवला वगैरे तर नाही ना हे कळू शकेल.

३) तिसरा कोड ##002# : हा कोड स्मार्टफोनसाठी खूप खास आहे, कारण त्याच्या मदतीने आपण कोणत्याही स्मार्टफोनवरील सर्व फॉरवर्डिंग डिऍक्टिव्हेट करु शकता. आपल्याला जर वाटले की आपला कॉल अन्यत्र कुठेतरी वळवण्यात आला आहे, तर या कोडच्या मदतीने आपण ते बंद करू शकता.

४) चौथा कोड #*#4636#*# : या कोडच्या मदतीने आपण आपल्या फोनबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. जसे की फोनमध्ये कोणती बॅटरी आहे, वाय-फाय कनेक्शन टेस्ट, फोनचे मॉडेल, रॅम इत्यादि.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *