चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले तर काय कराल ?

बदलत्या डिजिटल काळात आता बहुतांश लोक ऑनलाईन व्यवहारांकडे वळले आहेत. अर्थातच आर्थिक देवाणघेवाणीसोबतच विविध प्रकारच्या फी, विम्याचे किंवा कर्जाचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार, खरेदी, इत्यादी कामे ऑनलाईन झाली आहेत. वेगवेगळे रिचार्ज, विविध बिले, इतर व्यवहार ऑनलाइनच करता येतात. त्यामुळे लोकांना कॅश वापरायची किंवा बँकात जायची गरज नाही.

इंटरनेट कनेक्शन असेल तर कुठूनही आपल्या स्मार्टफोनवरुन लोकांना ऑनलाईन व्यवहार करता येतात. परंतु एक प्रश्न लोक सतत विचारतात, तो म्हणजे एखादेवेळी ऑनलाईन करताना चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले तर काय करायचे ? चला तर जाणून घेऊया…

कसे जमा होऊ शकतात इतरांच्या खात्यात पैसे ?

आपल्याकडे “अति घाई संकटात जाई” ही म्हण प्रसिद्ध आहे. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करत असताना घाईगडबडीत चुकीचा अकाउंट नंबर टाकल्याशिवाय असे होऊ शकत नाही. त्यामुळे पैसे पाठवताना आपण टाकलेलया अकाउंट नंबरची खात्री केल्यानंतरच पुढे जा.

पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले तर अशी करा तक्रार

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आपल्या अनुमतीशिवाय कुणीही आपल्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकत नाही. तसे झाल्यास तीन दिवसांच्या आत आपल्या बँकेत फोन किंवा ईमेल करुन त्याची माहिती द्यावी. त्यानंतर बँकेच्या मॅनेजरला भेटून आपली तक्रार नोंदवावी. संबंधित व्यवहाराची तारीख आणि वेळ याची बँकेला माहिती द्यावी. जमल्यास ऑनलाईन व्यवहाराचा स्क्रिनशॉट घ्यावा. तसेच चुकून ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, त्याच्या बँकेतही लिखित स्वरूपात तक्रार करावी आणि आपले पैसे आपल्याला परत मिळावेत यासाठी विनंती करावी.

असे मिळतील तुमचे पैसे परत

दोन्ही बँक आपापल्या पातळीवर तुमच्या तक्रारीची आणि व्यवहाराची तपासणी करतील. चुकून इतर कुणाच्या खात्यात ते पैसे गेले आहेत का किंवा चुकून इतर कोणी ते पैसे काढले आहेत का याचा तपास केला जाईल. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे गेले त्याच्या बँकेला आपल्या खातेदाराचे पैसे परत मिळण्यासाठी सूचना करतील. तपासणी झाल्यानंतर बँकेला खात्री पटल्यानंतर बँक तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत जमा करेल. त्यासाठी बँकेच्या सुद्धा काही अटी असतात.

तरीही पैसे परत नाही मिळाले तर अशी करा कायदेशीर कारवाई

सर्वप्रथम आपले पैसे पार्ट मिळण्यास्तही वरीलप्रमाणे कृती करा. एवढे करुनही तुम्हाला ज्याच्या खात्यात चुकून पैसे गेले आहेत तो खातेधारक किंवा त्याची बँक तुमचे पैसे परत मिळण्यासाठी नकार देत असेल तर सरळ पोलिसात तक्रार दाखल करा. आपली बँकसुद्धा आपल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसात त्याची तक्रार करु शकते. आपले पैसे आपल्याला परत मिळवून देणे ही आपल्या बँकेची जबाबदारी असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *