पहिल्यांदा बघा नेमके कसे असते डेथ वॉरंट, या वॉरंटच्या आधारेच गुन्हेगाराला दिली जाते फाशी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल, अशा बातम्या येत आहेत. दिल्लीचे पतियाळा हाऊस कोर्ट १३ डिसेंबरलाच गुन्हेगारांना डेथ वॉरंट बजावेल असा अंदाज होता. पण तसे झाले नाही. कोर्टाने १८ डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. १७ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दोषी अक्षय ठाकूर याच्या फाशीच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होईल. त्यानंतरच पतियाळा हाऊस कोर्ट डेथ वॉरंट बजावण्याबाबत निर्णय घेईल. गेल्या काही दिवसांपासून डेथ वॉरंटबद्दल बरेच काही बोलले जात आहे. पाहूया कसे असते डेथ वॉरंट..

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ अंतर्गत ५६ फॉर्म असतात. त्यापैकी फॉर्म क्रमांक ४२ ला डेथ वॉरंट असे म्हणतात. त्यावर ‘वॉरंट ऑफ एक्झिक्युशन ऑफ ए सेन्टेन्स ऑफ डेथ’ असे लिहलेले असते. याला ब्लॅक वॉरंट असेही म्हणतात. हे वॉरंट जारी झाल्यानंतरच एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिली जाते. डेथ वॉरंटच्या रिकाम्या जागांमध्ये जेल नंबर, फाशीवर लटकवल्या जाणार्‍या सर्व कैद्यांची नावे (जितकी संख्या असेल ती), खटला क्रमांक, डेथ वॉरंट बजावल्याची तारीख, फाशी देण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण ही माहिती भरावी लागते.

डेथ वॉरंटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहली जाते, ती म्हणजे गुन्हेगाराला फाशीवर तोपर्यंत लटकवण्यात यावे, जोपर्यंत त्याचा जीव जात नाही. त्यावर कोर्टाचा शिक्का मारुन त्यावर सही केली जाते. कोर्टाने दिलेले हे डेथ वॉरंट थेट जेल प्रशासनापर्यंत पोहोचते. फाशी दिल्यानंतर कैद्याचा मृत्यू झाल्याची खात्री करणारी कागदपत्रे कोर्टात दिली जातात. या व्यतिरिक्त कोर्टाचे डेथ वॉरंटही कोर्टाकडे परत केले जाते. डेथ वॉरंट कसे दिसते ते खालील फोटोत पहा –

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *