10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, ‘हे’ आहेत नियम आणि अटी

भारतात रोजगाराची समस्या रोज वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकजण स्वयंरोजगाराकडे वळत आहे. धंदा व्यवसाया कडे आता मराठी माणूस मोठ्या प्रमाणात वळत आहे. परंतु कुठला धंदा करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. गॅस एजन्सी हा देखील एक मोठा व्यवसाय आहे परंतु तो कसा सुरु करावा या बाबत अनेकांना माहिती नाही. कंपन्यांनी २०१९मध्ये नवे ५००० वितरक वाढविण्याचे उद्दिष्ठ ठरवले असल्यामुळे तुम्हाला या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. २००० नवे लायसेन्स सरकारने वितरीत केले असून ३४०० आणखी लायसेन्स सरकार वितरीत करणार आहे.

देशातील तीन सरकारी कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी डीलर बनविण्यासाठी जाहिरात आणि नोटिफिकेशन जारी केले आहे. २०१९ पर्यंत ५००० वितरकांचे जाळे निर्माण करणार आहे. त्यामुळे या एजन्सी संदर्भात जाहिरातींवर लक्ष ठेवणे गरजचे आहे. विविध वर्तमानपत्र आणि या तीन कंपन्यांच्या वेबसाईटवर याची जाहिरात झळकतात. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लॉटरी सिस्टिमने वितरक निवडला जातो. प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी असणार आहे. लॉटरीमध्ये नाव आल्यावर विजेत्याला पुढील प्रक्रियेसाठी बोलविण्यात येते.

गॅस एजन्सी उघडण्यासाठी एज्युकेशन क्वॉलीफिकेशन यापूर्वी पदवी असणे गरजेचे होते. पण आता ही आर्हता कमी करत १० पास केली आहे. आवश्यक अटी पुढील प्रमाणे आहे. उमेदवाराकडे कायमस्वरूपी पत्ता आणि जमीन हवी. गॅस एजन्सी आॅफिस आणि गोडाऊनसाठी जमीन हवी. जमीन कुठे हवी हे जाहिरातीत दिलं असतं. उमेदवार 10वी उत्तीर्ण हवा. त्याचं वय 21 वर्ष हवं. त्याचा बँक बॅलन्स आणि डिपाॅझिट रक्कमही हवी.

काही जागा आरक्षित असतात. अनुसूचित जाती, जनजाती, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, सामाजिकदृष्ट्या अक्षम लोक, पोलीस, सरकारी कर्मचारी यांना या वितरणात आरक्षण आहे. 50 टक्के सामान्य श्रेणीसाठी आहे. गॅस एजन्सी देताना तिथे सुरक्षा व्यवस्थित आहे ना, हे पाहिलं जातं. ऑइल कंपन्यांनी जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्सनुसार आता ६० वर्षापर्यंतच्या व्यक्ती अर्ज कर शकणार आहे. यापूर्वी एलपीजी डिस्ट्रीब्यूशन २१ ते ४५ वर्षांची वयोमर्यादा होती. कंपन्यांनी फॅमिली यूनिट च्या व्याख्येत आता विस्तार केला आहे.

अर्जशिवाय पती किंवा पत्नी, पालक, भाऊ, बहिणसह सावत्र भाऊ आणि बहिण, मुलांसह दत्तक घेतलेले मुलं, जावई आणि वहिनी, सासू- सासरे आणि आजोबा आजींना या लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे. यापूर्वी फॅमिली यूनिटमध्ये केवळ अर्ज करणारा पती-पत्नी, अविवाहित मुलं येत होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *