निर्भयाच्या बलात्कारी म्हणतोय, मला फाशी देऊ नका कारण..

हैद्राबाद आणि उन्नाव मध्ये घडलेल्या घटनांनी देशातील वातावरण गरम असताना दिल्लीच्या निर्भयावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार सध्या चर्चेत आला आहे. सूत्रांकडून आणि आणि उघडपणे लोकांमधूनही अनेक बातम्या येत आहेत. त्या सर्वांना आता तरी फाशी द्यावी याबद्दल खूप काही बोललं जात आहे. ऐनवेळी दोषी लोकांपैकी एकाने सुप्रीम कोर्टाकडे फाशीवर पुनर्विचार करण्यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. त्यात अशा अनेक विचित्र गोष्टी मांडल्या आहेत. एकवेळ वाटले कुठला याचिकाकर्ता असे बोलू शकतो, पण त्याची याचिकाच हातात पडल्यावर विश्वास बसला.

काय लिहलंय याचिकेत ?

अक्षय सिंग या गुन्हेगाराने दिल्लीच्या एनसीआरच्या प्रदूषणाच्या अहवालाचे कारण देत सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत लिहले आहे की, दिल्लीत सध्या खतरनाक वायू प्रदूषण आहे. दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलून गेली आहे. अशा परिस्थितीत मला वेगळ्या मृत्युदंडाची काय गरज आहे ? दिल्लीतील पाणीही विषारी बनले आहे. अशा विषारी हवा आणि पाण्यामुळे आधीच आमचे वयोमान कमी होत आहे, मग अशामध्ये फाशी देण्याची गरज का आहे ?

आता आठवली वेद उपनिषदे

बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर सरवोचच न्यायालयाने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली. साक्षात मृत्यूच डोळ्यांसमोर दिसू लागल्यानंतर आता गुन्हेगारांना वेद-पुराण आणि उपनिषदे आठवत आहेत. आपल्या याचिकेत पुढे ते लिहतात, “वेद पुराण आणि उपनिषेदत लोक हजारो वर्ष जगत असल्याचचे उल्लेख येतात. सतयुगात लोक हजारो वर्षे जगले. त्रेता युगातही माणूस हजार वर्षे जगला. पण कलयुगात माणसाचे वय ५०-६० वर्षे झाले आहे. तो स्वत:च लवकर मारतोय, अशामध्ये फाशी देण्याची काही आवश्यकता नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *