त्या रात्री.. , वाचा तृतीयपंथीया सोबत आलेला एक मनाला पाझर फोडणारा अनुभव..

त्या रात्री..

कोकण चा फिरायला जायचा प्लॅन फिक्स झाला होता. आज शनिवार, तशी सुट्टी नव्हतीच.. पण बॉस कामा निमित्त मुंबई ला गेला होता. म्हणुन दुपारीच ऑफिस मधून पाळायच हे मात्र नक्की होत.. सगळी काम आवरता आवरता दोन कधी वाजले कळलेच नाही. घरून दोन तीन मिस कॉल येऊन गेले होते.

पटकन बाइक काढली हेलमेट घातलं आणि निघालो. जाम ऊन पडल होत. त्यात सिग्नल वर सिग्नल पडत होते. जाम घाम येत होता. तेवढ्यात मागुन आवाज आला.. “ओ भैय्या… पचास रुपये दे दो ना आज.. थोडा हॉस्पिटल का मामला आहे” एक तृतीय पंथी (हिजडा) आला अणि पैसे मागू लागला. एक तर पन्नास रुपये वाचवायचे म्हणुन आज जेवलो देखील नाही. आणि याला फुकटचे पन्नास द्यायचे माझ्या बुद्धिला ते काही पटल नाही. काम करा काम… अशी दोन चार वाक्य बोलून मी निघून गेलो..

ठरल्या प्रमाणे आम्ही तीन जोड्या बाईक वर निघालो… जया बोलली की अजून ATM मधुन पैसे काढायचे आहेत. मी म्हणालो कोकणात ATM नाही का… बस लवकर आता. आपल्या मुळे सगळ्यांना उशीर नको. मस्त पैकी आम्ही सगळे निघालो. मूड चांगला असल्यामुळे सगळे फास्ट चालले होते. पण गप्पांच्या नादात आमची गाडी मात्र रस्ता चुकली. नेटवर्क नसल्यामुळे फोन सुधा लागत नव्हता आनि गूगल मॅप सुद्धा चालत नव्हता. काय पाप केल होत देव जाणे… कारण त्यात पेट्रोल सुद्धा संपल.

कॅश सुद्धा जवळ नव्हती. म्हणतात ना संकट आली की सर्व बाजूनी येतात. काही सुचत नव्हत काय कराव. अधून मधून एक दोन गाड्या जात होत्या रस्त्यानी. 7 वाजून गेले होते अंधार पडायला लागल्या मुळे कोणी थांबत सुधा नव्हत. जया तर आता रडायचीच बाकी राहिली होती. पुन्हा एकदा एक अर्ध्या तासानी एक गाडी आली सुधीरने गाडीला हात केला पण गाडी सुसाट निघून गेली… पण पुढे जाऊन थांबली आणि वळुन मागे ही आली. विशेष म्हणजे दोन्ही हिजडे होते.

ते सुधीर ला विचारू लागले.. हाय हाय.. क्या हुआ रे.. त्यांना पाहून सुधीर अजूनच भडकला. पण काय करणार पर्याय नव्हता. एव्हाना जया रडायलाच लागली. त्यांनी दोघांनी सुधीर ला आणि जया ला धीर दिला. त्यांच्या गाडीतल पेट्रोल काढून सुधीरच्या गाडीत टाकाल. नंतर चौघे जण गाडी घेवून पेट्रोल पंपावर पोहचले.. तिथेही ह्या हिजड्यांनी सुधीरच्या गाडीत 400 रुपयाचे पेट्रोल टाकले आणि त्याच्या 13 km वर असलेल्या हॉटेल पाशी त्याला नेऊन सोडले.

सुधीर ला काय बोलाव हे काही सुचत नव्हते. दुपारी आपली क्षमता असताना आपण मदत केली नाही आनि ह्या लोकांनी त्यांची ऐपत नसताना देखील आपल्याला एवढी मदत केली. सुधीर ला खूप खंत वाटली. तो हॉटेल शेजारील ATM मधून पैसे काढून आणत तो पर्यंत ते दोघे निघून गेले. त्यांना तर पैसे द्यायचे होते परंतु ते निघून गेले होते. सोमवारी मात्र आठवणीने सुधीर ने सिग्नल वर गाडी थांबवली त्या हिजड्यांच्या जवळ गेला आणि त्यांची चौकशी केली आणि विशेष म्हणजे आज सुधीर ने 400 नाही तर तब्बल चार हजार रुपये देऊ केले.

तृतीयपंथ असले तरी ते पण मनुष्य च आहे. त्यांनाही मन आहे. उगाच काही बोलून त्यांना दुखवू नका. पुरुषार्थच दाखवायचा असेल तर कुणाला तरी मदत करून दाखवा.

लेखांकन -© अमित वालझाडे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *