छोट्याशा लिंबाचे अनेक मोठे फायदे ज्याबद्दल आपण कधी कुठे वाचले नसेल

आहारामध्ये खाद्यपदार्थात लिंबाचा रस टाकल्यास त्याची चव वाढते. लिंबात असणारे व्हिटॅमिन सी आणि त्यातले इतर अनेक घटक आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. अशा या छोट्याशा लिंबाचे इतरही अनेक असे मोठे फायदे आहेत ज्याबद्दल आपण कधी कुठे वाचले नसेल. चला तर पाहूया…

१) वजनावर नियंत्रण : वजन कमी करण्यासाठी लिंबाचा वापर अवश्य केला पाहिजे. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत शरीरात जमा झालेल्या अतिरिक्त चरबी शिवाय अनेक अशुद्ध पदार्थ बाहेर टाकणे देखील आवश्यक असते. संशोधनाने समोर आले आहे की जेव्हा शरीरातील अशुद्ध पदार्थ कमी होतात, तेव्हा वजन जलद कमी होते. अर्थातच रोजच्या आहारामधील कॅलरी कमी केल्याशिवाय आणि शारीरिक हालचाली वाढवल्याशिवाय परिणाम दिसून येणार नाहीत.

२) सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचे अनेक फायदे आहेत. याव्यतिरिक्त कुठल्याही प्रौढ व्यक्तीने दिवसभरात पाण्याचे किमान ८ ते १० ग्लास प्यायला हवेत. लिंबूपाणीमध्ये गोडी येण्यासाठी साखरेऐवजी मधाचाही वापर करता येईल.

३) आहारामध्ये फळे व पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे आणि मांस व गोड पदार्थांचे प्रमाण कमी करणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त सिद्ध होते. आपल्या लोणच्यात किंवा अन्नपदार्थांमध्ये लिंबाचा रस वापरावा. व्हिटॅमिन सी बरोबरच लिंबू हा पोटॅशियमचा देखील चांगला स्रोत आहे, ज्यामुळे मज्जासंस्था, हृदय आणि स्नायू व्यवस्थित कार्य करतात.

४) लिंबाच्या रसात बॅक्टेरियानाशक गुणधर्म आढळले आहेत. त्यामुळे पचनाला मदत होते. तसेच आतड्यातील हानिकारक जिवाणू नष्ट करून मूत्रावाटे शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू मदत करते. पोट आणि आतड्याचे आरोग्य टिकून राहण्यासाठी लिंबू मदत करते.

५) जर्मनीच्या बोखम विद्यापीठाच्या संशोधकांना असे आढळून आले आहे की, कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यात लिंबाचा खूप उपयोग होतो. त्याशिवाय किडनी आणि किडनीतील खडे तयार होण्यास लिंबू प्रतिबंध करत असल्याचे देखील आढळून आले आहे.

६) लिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मोठया प्रमाणावर आढळतात. त्यामुळे त्वचा तरूण राहण्यासाठी मदत होते. तसेच लिंबात अनेक ब्लिचिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे केसाने त्यांच्या रंगाने हलके करता येते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *