सौंदर्यवती स्पर्धेत “मोदी भेटले तर तु काय सांगशील” या प्रश्नावर मॉडेलने दिले हे उत्तर

कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी येथे “मिस कोहिमा ब्यूटी पिजंट २०१९” या सौंदर्यवती स्पर्धेची अंतिम फेरी सुरू होती. त्यामध्ये तीन विजेत्यांची निवड केली जाणार होती. त्यांना प्रश्न विचारले जात होते. त्यातल्या एका स्पर्धक मॉडेलला परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला त्या मॉडेलने दिलेले उत्तर सध्या चांगलंच गाजत आहे.

काय होता प्रश्न आणि त्या मॉडेलने काय उत्तर दिले ?

मिस कोहिमा ब्यूटी पिजंट २०१९ स्पर्धेच्या अंतिम फेरीत परीक्षकांनी एका स्पर्धक मॉडेलला प्रश्न विचारला, “समजा तुला देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी निमंत्रित केले, तर तू त्यांना काय सांगशील ?”

या प्रश्नावर त्या मॉडेलने उत्तर दिले की, “समजा पंतप्रधान मोदी यांनी मला चर्चेसाठी आमंत्रित केले, तर मी त्यांना सांगेन गायीऐवजी महिलांकडे जास्त ध्यान द्या. अधिक लक्ष द्या. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा.”

मॉडेलचे उत्तर ऐकून परीक्षकांनी काय निकाल दिला ?

वय वर्ष १८ आणि एक विद्यार्थिनी असणाऱ्या त्या मॉडेलने दिलेले उत्तर सोशल मिडियावर तर चांगलेच व्हायरल होत आहे. एवढ्या लहान वयाच्या मुलीला जे कळतंय ते देशाच्या प्रधानमंत्र्याला कसं कळत नाही म्हणुन नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. पण त्या मॉडेलचे उत्तर ऐकून परीक्षकांनी निकाल दिला. त्या मॉडेलला प्रथम क्रमांकाचे विजेतेपद तर काय मिळाले नाही, परंतु निश्चितच तिने द्वितीय क्रमांकाचे उपविजेतेपद मिळविले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *