दम बिर्याणी: कामगारांसाठी बनवलेली बिर्याणी अशी पोहोचली शाही स्वयंपाकघरात

आय लव्ह बिर्याणी ! हे वाक्य तुम्ही अनेक बिर्याणी प्रेमींकडून ऐकलं असेल. पण जेव्हा आपण बिर्याणी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात चटकन येणारा दुसरा शब्द म्हणजे दम ! दम बिर्याणी, मग तो शाकाहारी असो की मांसाहारी, ती इतकी स्वादिष्ट असते की खाणारा त्याची चव विसरु शकत नाही.

पण दम बिर्याणी ही इतकी खास काय ? दम बिर्याणी पहिल्यांदा कधी बनविण्यात आली होती ? फारच कमी लोकांना याची उत्तरे माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया.

दम बिर्याणीचे श्रेय कुणाला ?

दम बिर्याणीच्या शोधाचे श्रेय मोगलांना जाते. वास्तविक, मुघल सम्राटांच्या शाही किचनमध्ये दम पुख्त नावाच्या पद्धतीने जेवण बनवले जायचे. या पद्धतीत हंडी किंवा चिकणमातीच्या भांड्यात अन्नाला अनेक मसाल्यांसोबत ठेवले जायचे आणि ते खूप वेळापर्यंत मंद आचेवर शिजवले जायचे.

हळू शिजवण्याच्या या प्रक्रियेत, सर्व मसाले आणि औषधी वनस्पतींचा वास त्या अन्नामध्ये उतरायचा. त्यामुळे त्या अन्नाची चव बदलायची. या पद्धतीने ते लोक ते कोरमा, निहारी, हलीम असे पदार्थ बनवत असत.

दम बिर्याणीचा शोध कसा लागला ?

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा नवाब असफ-उद-दौला अयोध्येमध्ये राज्य करत होता. १७८४ मध्ये तिथे असा दुष्काळ पडला की लोक उपासमारीने मरायला लागले. मध्ये असा दुष्काळ पडला की लोक उपासमारीने मरतात.

या उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी नवाबाने लोकांना जेवण आणि रोजगार या दोन्ही गोष्टींची व्यवस्था करण्याचा विचार केला. त्यानंतर त्याने इमामवाडा बांधायचा आदेश दिला. यामुळे लोकांना रोजगाराबरोबरच दोन वेळेची भाकरीही मिळाली. लोकांसाठी हे भोजन दम पुख्तच्या पद्धतीने तयार केले गेले.

अशी पोहोचली कामगारांसाठी बनवलेली बिर्याणी शाही स्वयंपाकघरात

एके दिवशी असेच अनेक प्रकारचे मसाले आणि भाजीपाल्यासोबत भात शिजवला जात होता. नवाबाला त्याचा सुगंध आवडला आणि त्याने तो भात शाही स्वयंपाकघरात बनविण्याचा आदेश दिला. नावाबाला ही बिर्याणी खूप आवडली. दम पुख्त पद्धतीने बनवण्यात आल्याने तिला “दम बिर्याणी” हे नाव ठेवले गेले.

तेव्हापासून शाही स्वयंपाकघरात प्रत्येक विशेष प्रसंगी ते शिजवले जायला लागले. तिथूनच ते हैदराबाद, काश्मीर आणि भोपाळमधील शाही स्वयंपाकघरातही पोहोचले. अशा प्रकारे, दम बिर्याणीची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळली. आता ही दम बिर्याणी चिकन आणि मटण घालूनही बनवली जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *