लग्नाच्या पहिल्या रात्री दूध पिण्याची परंपरा काय आहे ?

मधुचंद्र हा लग्नाचा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा असतो. नवविवाहित जोडपी आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात लग्न झाल्यावर याच टप्प्यानंतर सुरु करतात. नवविवाहित जोडपी मधुचंद्राच्या बाबतीत आपल्या मनामध्ये अनेक प्रकारची अनेक प्रकारची स्वप्ने सजवत असतात. आपल्या आयुष्यातील हा खास क्षण आठवणीत राहण्याजोगा बनवण्यासाठी नवदाम्पत्य अनेक मार्गांनी प्रयत्न करतात.

मधुचंद्राच्या रात्री दुधाचा संपूर्ण ग्लास पिणे आवश्यक असते. असे सांगितले जाते की ही एक प्रकारची विधीचा आहे. चला तर जणू घेऊया मधुचंद्राच्या दिवशी दुधाचा ग्लास का दिला जातो आणि काय आहेत त्याचे फायदे ?

काय आहे परंपरा ?

आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की नवविवाहित जोडप्यांना लग्नाच्या रात्री दूध देण्याची एक परंपरा आहे. या दुधात केशर आणि बदाम घातले जातात. वेगवेगळ्या मार्गानी हे दूध तयार केले जाते. उदाहरणार्थ फक्त बदाम आणि मिरपूड घालून किंवा फक्त बारीक केलेल्या बदामाची पूड टाकून किंवा बडीशेपचा रस दुधामध्ये घालून हे दूध तयार केले जाते.

या दुधामध्ये खडीसाखरही वापरली जाते. हिंदू धर्माच्या अनुसार दूध हा एक शुद्ध पदार्थ असून तो खूप शुभ मानला जातो. नवदाम्पत्य आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात करीत असताना त्यांना दूध दिले जाते.

ही परंपरा कुठून आली ?

अनेक महान ग्रंथांनुसार, शारीरिक संबंधाच्या वेळी ऊर्जा वाढवण्यासाठी या गोष्टींना आहारामध्ये समाविष्ट केले गेले आहे. नवविवाहित जोडप्याचा मधुचंद्राचा आनंद वाढवण्यासाठी वाढविण्यासाठी याचा समावेश केला होता. दूध, मध, साखर, हळद, मिरपूड आणि बडीशेपचा रस अशा विविध प्रकारच्या मिश्रणामुळे दुधासारखेच नवदाम्पत्यांचे नाते घट्ट बनते असे मानले जाते.

बदाम आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असल्याने त्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते. या प्रोटीनचा उपयोग टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक असतो. तसेच त्यात कामोत्तेजक औषधासारखे गुणधर्मही असतात. दूध, केशर आणि बदाम हे एक शक्तिशाली संयोजन आहे, जे शरीराला ऊर्जा प्रदान करते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *