अनंत अंबानीने विनाशस्त्रक्रिया १८ महिन्यात ११८ किलो वजन कमी कसे केले ?

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानचे वजन २०८ किलो होते. लठ्ठपणामुळे अनंतला डायबेटिज, दमा यासारख्या आजारांनी ग्रासले होते.

आयपीएलच्या सामन्यांदरम्यान मैदानात तो जेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघाला सपोर्ट करत होता, तेव्हा त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्याच्या लठ्ठपणामुळे त्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आले होते. पण त्याच अनंत अंबानीने केवळ १८ महिन्यात ११८ किलो वजन कमी करुन सर्वांना चकित केले आहे. पाहूया काय आहे या वजन घटवण्यामागची कथा…

विनाशस्त्रक्रिया असे केले अनंत अंबानीने १०८ किलो वजन कमी

अनंतच्या लठ्ठपणामुळे त्याला खूप त्रास व्हायचा आणि लोकही त्याची थट्टा करायचे. त्यामुळे अनंतने वजन घटवण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने त्यावर काम केले. विशेष म्हणजे अनंतने १८ महिन्यात कोणतीही शस्त्रक्रिया न करता १०८ किलो वजन कमी करुन दाखवले आहे.

त्यासाठी अनंत दररोज ५-६ तास वर्कआऊट करत होता. जामनगरमध्ये अनंत रोज २३ किलोमीटर चालायचा. एक दिवस देखील अनंतने सुट्टी घेतली नाही. वर्कआऊट सोबतच अनंतने High Intensity Cardio व्यायामदेखील केला. तसेच योगाही केला.

अनंतचे वजन कमी करण्यासाठी या ट्रेनरने घेतली मेहनत

अनंत अंबानींचे वजन कमी करण्यामध्ये त्याचे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांची भूमिका महत्वाची आहे. चन्ना हे जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, आयुष्यमान खुराणा, सोहेल खान अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे फिटनेस ट्रेनर राहिले आहेत. अनंतला असणाऱ्या दम्याच्या आजारासाठी तो जी औषधे वापरत होता, त्यामुळे त्याचे वजन वाढत होते.

हे लक्षात घेऊनच चन्नाने त्याचा डाएट आणि फिटनेस प्लॅन तयार केला. त्यासाठी चन्नाने नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग वापरला. सुरुवातीला कमी तीव्रतेचा व्यायाम, नंतर सायकलिंग आणि चालण्याचा व्यायाम केला. आधी चरबी कमी करण्याचा आणि नंतर वजन कमी करण्याची ट्रेनिंग देण्यात आली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *