फोटोत दिसणारी हि चिमुकली आहे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री!

आजकाल बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीच्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रींच्या बालपणीच्या फोटोना चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक करत आहेत. सेलिब्रिटींचे हे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

असाच एक फोटो एका अभिनेत्रीचा व्हायरल झाला आहे. फोटोत दिसणारी हि चिमुकली आज बॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तुम्हाला अंदाज आलाच असेल कि हि अभिनेत्री नेमकी कोण आहे. तुम्हाला हि चिमुकली कोण आहे हे ओळखू नसेल आले तर जाणून घेऊया नेमकी कोण आहे हि अभिनेत्री.

हि चिमुकली गाजवते बॉलिवूडवर अधिराज्य-

फोटोत दिसणारी हि चिमुकली दुसरीतिसरी कुणी नसून दीपिका पादुकोण आहे. फोटोत ओळखू न येणारी दीपिका आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. लक्ष्मी अग्रवाल या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दीपिका आणि निमार्ता मधू मंटेना मिळून लवकरच महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे.

दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री-

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची क्वीन बनली आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.

ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *