नवऱ्याच्या पैशाने लोकांना मदत करतात या अब्जाधीशांच्या बायका

साधारणपणे आपण जेव्हा श्रीमंती बद्दल बोलत असतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी आपल्या देशातील अंबानी, मित्तल, पुनावाला यांच्यासारखे ठराविक चेहरेच येतात आणि ते खरेही आहे.

देशातील लोकांनाही श्रीमंतांबद्दल जाणून घ्यायला आवडते. त्यांचे उत्पन्न, त्यांचे राहणीमान, ते वापरत असलेल्या महागड्या गोष्टी यांचे लोकांना कायम कुतूहल असते. आज आम्ही आपल्याला अशाच काही अब्जाधीश उद्योगपतींच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या आपल्या उत्पन्नातून समाजकार्य करतात.

१) नीता अंबानी :

रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास ७२ कोटींच्या घरात आहे. नीता अंबानी स्वतः एक शाळा देखील चालवतात. याशिवाय त्यांनी अनेक फाऊंडेशन देखील सुरु केली आहेत, जी गोरगरिबांची मदत करत असतात. या व्यतिरिक्त कुटुंबातील पारंपरिक कार्यक्रमांमध्येही नीता अंबानी समाजकार्याचा अंतर्भाव करताना दिसून येतात.

२) टीना अंबानी :

मुकेश अंबानी यांचा भाऊ आणि उद्योगपती अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानीही चांगल्याच लोकप्रिय आणि सुंदर आहेत. त्यांनी एक अभिनेत्री म्हणूनही काम केले आहे. टीना अंबानी युवा कलाकारांना मदत करतात. तसेच अनेक सामाजिक कार्यातही टीना अंबानींची उपस्थिती आढळून येते.

३) उषा मित्तल :

देशातील सर्वात मोठे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे.

४) नताशा पूनावाला :

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मालक आदर पूनावाला यांच्या पत्नी नताशा पूनावाला या अनेकदा चर्चेत असतात. नताशा “विल्लू पूनावाला” या नावाने एक फाउंडेशन चालवतात. त्या माध्यमातून त्या खूप सामाजिक कामे करतात, ज्यामुळे अनेक लोक त्यांना शुभार्शिवाद देतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *