विदेशात जन्मलेल्या या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये आहे बोलबाला

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ भारतातीलच नाही, तर विदेशातीलही कलाकार भारतात आपले भवितव्य आजमावायला येतात. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलिवूड मधील अभिनेत्रींच्या फॅशन आणि स्टाईलचे जगभर चाहते आहेत. परंतु त्यापैकी अनेक अभिनेत्रीचा जन्म भारतात नाही, विदेशात झाला असल्याचे अनेकांना माहित नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, कोणकोणत्या अभिनेत्रीचा जन्म विदेशात झाला आहे.

१) दीपिका पदुकोण :

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण हीच जन्म भारतात नाही तर डेन्मार्कमध्ये झाला आहे. दीपिकाच्या जन्मानंतर एक वर्षाने तिचे कुटुंब भारतात आले. दिपीकाकडे आता भारतीय नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे.

२) कॅटरिना कैफ :

बॉलिवूडमधील “काला चष्मा गर्ल” कॅटरिना ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. २००३ सालच्या बूम चित्रपटाच्या माध्यमातून कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कॅटरिनाचे वडील भारतीय तर आई अमेरिकन आहे. कॅटरिनाकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.

३) नर्गिस फाखरी :

नर्गिस फाखरीने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. रॉकस्टारमधुन पदार्पण करणाऱ्या नर्गिसचा जन्म अमेरिकेत झाला होता. नर्गिसचे वडील पाकिस्तानी आणि आई चेक रिपब्लिकन आहे.

४) जॅकलिन फर्नांडिस :

जॅकलिन फर्नांडिसचा जन्म श्रीलंकेतील मनामा शहरात झाला आहे. २००६ मध्ये मिस श्रीलंका बनलेल्या जॅकलिनने २००९ मधील अलादिन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जॅकलिनचे वडील श्रीलंकन तर आई मलेशियन आहे.

५) एमी जॅक्सन :

एक दिवाना था चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड करिअर सुरु करणाऱ्या एमी जॅक्सनचा जन्म आयल ऑफ मॅन देशात झाला होता.

६) सनी लिओनी :

आपल्या मादक अदांनी बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव मिळवलेल्या सनी लिओनीचा जन्म कॅनडामधील सार्निया शहरात झाला होता. पॉर्नस्टार म्हणून सनीने तिचे करिअर सुरु केले होते. २०१२ मधील जिस्म-२ चित्रपटातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *