भाजप सेना सत्ता स्थापने करिता बच्चू कडूंनी सुचवली हि आयडिया..

भाजपा सेना सत्ता स्थापनेचा वाद थांबण्याचे काही लक्षण दिसत नाही आहे. यावर आ बच्चू कडू यांनी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे. आज बच्चू कडू हे मातोश्री येथे आले असता त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना हि आयडिया सुचवली आहे.

बच्चू कडू म्हणाले कि , शेतकऱ्याच्या डोक्यात फक्त जगणं आहे. शेवटच्या क्षणात हा पाऊस आल्यानं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. त्याला या राजकारणी लोकांकडूनच अपेक्षा आहे. तुम्ही काय असेल ते करा. पण मदत तर जाहीर करा, तुम्ही किती मदत देणार ते तरी आधी जाहीर करा, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. शेतकऱ्याच्या मुलींचं लग्न असेल, मुलांचं शिक्षण किंवा पुढच्या रब्बी पिकांची व्यवस्था त्यांना करायची असते.

मुख्यमंत्री या राज्याला मिळाला किंवा नाही, तर राज्य थांबणार नाही. शेतकरी मेला तर राज्य थांबल्याशिवाय राहणार नाही. सत्ता स्थापनेसाठी कोणाला आमंत्रित करावं याऐवजी राज्यपालांनी शेतकऱ्यांना कशी मदत देता येईल ही भूमिका घेतली पाहिजे. यावर निर्णय न घेतल्यास राजभवनासमोर आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे.

हि भन्नाट युक्ती सुचवली

“शिवसेनेत सर्व वाघाचे बछडे आहे. त्यामुळे शिवसेना का घाबरेल” अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी दिली. उद्या काही जण शरद पवारही शिवसैनिक आहेत असं म्हणतील. जर देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि यावर तोडगा काढावा, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.”

देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि मुख्यमंत्री व्हावं, असंही बच्चू कडूंनी सुचवलं आहे. सुधीर मुनगंटीवार फडणवीस शिवसैनिक असल्याचं सांगतात, पण त्यांची शिवसेनेत प्रवेश करून मुख्यमंत्री होण्याबाबत काहीच हरकत नसावी, असंही ते म्हणाले आहेत.

तुम्हाला जी काही तोडफोड करायची असेल ती नंतर करा. पण पहिला शेतकरी वाचणं महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर राज्यपालांकडे मोर्चा काढू अशा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

आपल्यला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *