ओलाव्यामुळे घरात झालेले झुरळ या साध्या उपायाने एका दिवसात घालवा

घरात ओलावा वाढल्यास झुरळ मोठ्या संख्येने घरात येतात. यावर्षी लांबलेल्या पावसाळ्यामुळे सर्वत्र ओलसरपणा पाहायला मिळत आहे, त्यामुळे झुरळांची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

झुरळ घरातील अन्नधान्य, पाणी दूषित करतात, त्यामुळे ज्या घरात झुरळ येतात त्या घरात आरोग्याच्या समस्यादेखील येतात असे गणित आहे. बरेच प्रयत्न केले, बाजारातील खर्चिक स्प्रे वापरले तरी झुरळ जात नाहीत. पण आम्ही आपल्याला असे काही घरघुती आणि साधे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे झुरळांची समस्या एक-दोन दिवसातच कमी होते.

१) साखरेचे पीठ आणि खाण्याचा सोडा समप्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करा आणि मिश्रणाची पूड झुरळ झालेल्या ठिकाणी टाका. साखरेकडे झुरळ आकर्षित होतील आणि सोडा खाल्ल्यामुळे मरुन जातील. २) झुरळ झालेल्या ठिकाणी काकडी कापून टाकल्यास तिच्या वासानेच झुरळ पळून जातील.

३) मसाल्यामधील तमालपत्राच्या पानाचा वास उग्र असतो. या पानांचा चुरा करुन झुरळ झालेल्या ठिकाणी टाकल्यास त्याच्या उग्र वासाने घरातील झुरळ निघून जातील.

४) कडुनिंबाचे एक चमचाभर तेल स्प्रे-बॉटलमध्ये टाकुन त्यात पाणी भरा आणि झोपण्यापूर्वी झुरळ झालेल्या ठिकाणी फवारा किंवा कडुनिंबाच्या पानाची पूड झुरळ झालेल्या ठिकाणी टाका; झुरळ निघून जातील.

५) पुदिन्याची ताजी पाने किंवा पुदिन्याची पाने टाकुन उकळलेले पाणी झुरळ झालेल्या ठिकाणी टाकल्यास झुरळ निघून जातील. ६) वाटीत कॉफी आणि पाणी घेऊन झुरळ झालेल्या ठिकाणी ठेवल्यास झुरळ कॉफीच्या वासाने त्याकडे आकर्षित होतात आणि त्यात पडून मरुन जातात.

७) झुरळ झालेल्या ठिकाणी मसाल्यातील लवंगा ठेवल्यास त्याच्या उग्र वासाने झुरळ पळून जातात. ८) झुरळ झालेल्या ठिकाणी रॉकेल ठेवल्यास त्या वासाने झुरळ निघून जातात. ९) याव्यतिरिक्त घरातील कचऱ्याचा डबा बाहेर ठेवावा आणि घरात अन्न सांडू नये. भोजन झाकून ठेवावे. फळांच्या किंवा भाज्यांच्या साली, देठ बराचवेळ घरात ठेऊ नये. १०) सांडपाण्याच्या निचऱ्याच्या ठिकाणी जाळी लावावी. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. वेळच्यावेळी कचऱ्याची विल्हेवाट लावावी.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *