महाराष्ट्रात सत्तास्थापनेत काय होणार हि आहे सट्टेबाजारातील आतली बातमी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवस उलटले आहेत. निकालात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याशिवाय गत्यंतर नाही.

परंतू अद्याप कुठल्याही पक्षाने किंवा युती/आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केला नसल्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या अस्थिर बनले आहे. अशा या अस्थिर राजकीय वातावरणामुळे कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते इथपर्यंत देखील अनेकजण बोलले आहेत.

सत्ताबाजाराविषयी सट्टाबाजार काय सांगतोय ?

निवडणुकीदरम्यान प्रत्येक हालचालींवर सट्टाबाजाराची बारीक नजर असते. या सट्टाबाजारात मात्र वेगळीच चर्चा आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेमुळे वर्षाच्या आतच राज्यात विधानसभेच्या फेरनिवडणुका होतील यावर सट्टा लावला जात आहे. अशा अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर राज्यात एखादे सरकार स्थापन झाले तरीदेखील ते सरकार जास्त दिवस चालणार नाही आणि ते कोसळेल असा सट्टाबाजाराचा अंदाज आहे. त्यामुळेच सट्टाबाजारात स्थिर सरकारसाठी २० रुपयांचा तर फेरनिवडणूकीसाठी २५ रुपयांचा दर फुटला आहे.

सट्टाबाजाराचा अंदाज खरा होईल का ?

राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. परंतु महायुतीच्या प्रमुख पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सहमती होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच इतके दिवस हा विषय ताणला गेला आहे. कोणीच माघार घ्यायला तयार नाही.

त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधातील वक्तव्ये वादात भर टाकण्याचे काम करत आहेत. दरम्यान भाजपने आपल्या नेत्यांना फेरनिवडणुकींसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच सट्टाबाजारात वर्तवला जाणाऱ्या शक्यतांना बळ मिळाले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *