या मुलीला आईसाठी नवरा हवा आहे; कारण वाचून तुम्हीही कौतुक कराल..

सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. ती म्हणजे एका मुलीने आपल्या आईसाठी वर शोधण्यासाठी टाकलेली पोस्ट. एका मुलीने आपल्या आईसाठी वर हवा आहे म्हणून ट्विटरवर एक ट्विट केले. त्यानंतर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून वर शोधण्याचा प्रकार नवीन नाहीये. पण यामध्ये मुलीने आपल्यासाठी नाही तर आईसाठी वर शोधण्यासाठी हे ट्विट केले आहे. हि गोष्ट सर्वांसाठी वेगळी असून तिच्या या पोस्टमुळे तिचे कौतुक होत आहे.

या पोस्ट करणाऱ्या मुलीचे नाव आहे आस्था वर्मा. आस्था वर्माने आईसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, ‘माझ्या आईसाठी 50 वर्षीय हँडसम नवऱ्या मुलाच्या शोधात आहे. शक्यतो तो शाकाहारी असावा आणि मद्यपान करणारा नसावा.’

तिला थोड्या फार प्रमाणात या ट्विटवर ट्रोल देखील करण्यात आले असले तरी मोठ्या प्रमाणात तिच्या या निर्णयाबद्दल कौतुक केले जात आहे. आस्थाच्या या ट्वीटला आतापर्यंत ५.७ हजार रिट-ट्वीट मिळाले असून २८ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

का घेतला आस्थाने हा निर्णय?

भारतात मुलं झाल्यानंतर दुसरं लग्न करण्याला मान्यता नाहीये. आपल्याकडे असे फार कमी प्रमाणात होते. पण आस्थाने याला छेद देत आईचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तिचे लग्न करण्याचा हा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाचे सर्व स्थरांवरून कौतुक होत आहे.

आस्था हि एक कवियित्री असून तिच्या ट्विटरवर ती राजकीय निरीक्षक आणि नेल आर्टिस्ट असल्याचा तिने उल्लेख केला आहे. आताची पिढी ही आई- वडील आणि त्यांच्या आयुष्याबद्दल किती सजग आहे याचा प्रत्यय आस्थाच्या या कृतीतून येतो.

काही वर्षांपूर्वी अशा गोष्टींचा विरोध केला जायचा आता याला प्रोत्साहन दिलं जात आहे. आईच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी आस्थाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळो हिच अपेक्षा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *