तब्बल 30 जेसीबींनी गुलाल उधळत रोहित पवार यांची मिरवणूक, बघा व्हिडीओ..

रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरले. भाजपचा गड असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून ते विधानसभेत पोहचले. रोहित पवार यांनी मागील ३ वर्षापासून कर्जत जामखेडमध्ये विविध उपक्रम राबवले. त्याचच फायदा त्यांना निवडणुकीत झाला.

कठीण वाटणारी निवडणूक त्यांच्यासाठी सोपी झाली. त्यांची हि निवडणूक जनतेने हातात घेतली आणि त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवत थेट कॅबिनेट मंत्र्यांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर रोहित पवार यांचे राज्यभरातून कौतुक झाले.

या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर रोहित पवार हे आज पहिल्यांदाच जामखेड शहरात येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. जामखेड शहरात त्यांचे आज ३० जेसीबीच्या साहाय्याने गुलाल उधळत वाजत गाजत स्वागत करण्यात आले. जामखेड शहरातून रोहित पवार यांची हि भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जनतेचे आभार मानण्यासाठी रोहित पवार जामखेड शहरात आले असता त्यांची भव्य आभार मिरवणूक शहरातून काढण्यात आली. शहरातील प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करून तिच्या साहाय्याने गुलालाची उधळत करण्यात आली. रोहित पवार यांच्या या भव्य मिरवणुकीनंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे तर त्यांच्या समर्थकांनी हे जनतेचे प्रेम असल्याचे म्हंटले आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *