पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसणाऱ्या ‘या’ आजीबाई कोण आहेत माहिती का?

नुकतेच विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत शरद पवार यांचा झंजावात महाराष्ट्राने बघितला. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली नसली तरी शरद पवार यांनी हि निवडणूक गाजवली. राष्ट्रवादीसह काँग्रेसला देखील त्यांच्यामुळे चांगले यश मिळाले. निकालानंतर २ दिवसांनी दिवाळी सण होता. निवडणुकीतील धामधुमीनंतर पवार कुटुंबाने नेहमीप्रमाणे हि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली.

सुप्रिया सुळे यांनी या दरम्यान एक फेसबुक पोस्ट टाकली ज्यामध्ये एक आजीबाई दिसल्या. त्या आजीबाई पवार कुटुंबाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी नेहमीच सोबत असतात. त्यानंतर त्या कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला. आज खासरेवर जाणून घेऊया या आजीबाई नेमक्या आहेत तरी कोण..

कोण आहेत या आजीबाई?

या आजीबाईंचे पवार कुटुंबियांसोबत रक्ताच्या नात्यांपलीकडील नातं आहे. पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या असतात. त्यांनी पवार कुटुंबीयांसोबत ५० वर्षाहून अधिक काळ घालवला आहे. या आजीबाईंचं नाव आहे इंदुबाई झारगड.

इंदुबाई या मूळच्या इंदापूर तालुक्यातल्या काझड गावच्या रहिवाशी आहेत. सध्या त्या गावातच मुलांसोबत राहतात. पवार कुटुंबातील कोणताही कार्यक्रम असला की इंदूबाईना विशेष निमंत्रण दिलं जातं. त्यांना सणाला आहेर देखील घेतले जातात. इंदूबाईनी अनेक काळ पवार कुटुंबाची सेवा केली आहे. त्यानंतर आता पवार कुटुंब देखील त्यांची उतारवयात कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात.

अजित पवार हे २ वर्षाचे असताना इंदुबाई या पवार कुटुंबामध्ये आल्या होत्या. तेव्हापासून त्यांनी अजित पवार यांचा सांभाळ केला आहे. त्यांनी पवार कुटुंबातील तीन पिढ्या बघितल्या आहेत. शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार आणि अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार यांच्या काळात त्या पवार कुटुंबात आल्या होत्या.

इंदूबाईनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेकांचा सांभाळ केला आहे. अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार याचा विवाह त्या असताना करावा अशी त्यांची इच्छा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *