मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांचा पाठिंबा कोणाला? वाचा

निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी भाजप सेनेमधील सत्तासंघर्ष अजून थांबला नाहीये. भाजप शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून बेबनाव असून महायुती म्हणून लढलेल्या या पक्षांनी अजून सत्तास्थापनेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाहीये.

दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दावे-प्रतिदावे सुरु आहेत. शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्राही आहे तर भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नसल्याचे वारंवार सांगत आहे. ५ वर्ष देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

तर दोन्ही पक्षाकडून अपक्ष आपल्या बाजूने करण्यासाठी चढाओढ लागली आहे. गेल्या आठवड्यात विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी भाजपा, शिवसेनेत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. सत्तेच्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे.

भाजपचे १०५ आमदार निवडून आले तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. दोन्ही पक्षांना अनेक अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अपक्ष आपल्याकडे वळवून सत्तेत आपला दावा मजबूत असावा यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.

प्रहारच्या बच्चू कडू, राजकुमार पटेल, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांच्यासह अन्य ३ अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर भाजपला अपक्ष आमदार रवी राणा, राजेंद्र राऊत, गीता जैन, विनोद अग्रवाल, संजय शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे.

मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेस पक्ष देखील यावर विचार करेल असे काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. भाजप सेनेतील तणाव मुख्यमंत्रीपदावरून अधिकच वाढत आहे.

दोन्ही पक्ष अधिकाधिक आमदार आपल्याकडे असावे यासाठी प्रयत्नशील आहेत. विधानभेत मनसेचे राजू पाटील यांच्या रूपाने एकमेव आमदार निवडून गेले. त्यांचा पाठिंबा कोणाला असा प्रश्न त्यांना विचारणार आला. त्यावर त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

मनसेने विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. जर आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आल्यास मनसेच्या एकमेव आमदाराने सेनेला पाठिंबा दिल्यास नवल वाटू देऊ नका.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *