महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार पोटपाण्यासाठी चालवतात चहा टपरी..

निवडणुकीच्या या रणधुमाळीत जवळपास सर्वच आमदार करोडपती होते परंतु या मध्ये काही अपवाद देखील आहे. महाराष्ट्रातील सर्वात निवडून आलेला सर्वात गरीब आमदार कोण याचा शोध आम्ही घेतला आणि आम्हाला खालील माहिती मिळाली आहे. निवडणूक लढवायला कोटीने खर्च होतो परंतु यांनी ते बिना पैश्याने करून दाखविले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणू येथील आमदार या सर्वाना अपवाद निघाले आहे. विनोद भिवा निकोले हे डहाणू विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा डहाणू मतदार संघात कॉम्रेड विनोद निकोले यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांचा चार हजार हून अधिक मतांनी पराभव केला आहे.

केवळ पैश्याच्या जोरावर राजकारण राहत नाही हे निकोले यांनी लोकांना दाखवून दिले आहे. कार्यकर्त्याच्या म्हणण्या नुसार निकोले यांनी सामान्य लोकांच्या प्रश्नाकरिता नेहमी संघर्षाची भूमिका घेतल्यानि त्यांना जनतेनी डोक्यावर घेतलेले आहे.

स्वतःच्या पोटापाण्यासाठी निकोले हे डहाणू येथील इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्स च्या आवारात टपरी टाकून चहा आणि वडापाव ची विक्री करतात. एस.वाय.बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या निकोले यांना समाज सेवेची पहिले पासून आवड होती.

याच चहा टपरीवर माकपचे जेष्ठ कॉम्रेड एल. बी. धनगर यांच्या सोबत ओळख झाली आणि त्यांनी त्यांना माकप मध्ये आणले. २००३ पासून ते माकप मध्ये काम करतात. २००६ पासून ते माकपचे पूर्ण वेळ सदस्य होते. ५०० रुपये मानधनावर त्यांनी माकपचे पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केले.

त्यांच्या कडे एकूण ५१,०८२ रुपये एवढी रोकड असून त्यांना रहायला स्वतःच्या मालकीचे घर देखील नाही आहे. आदिवासी प्रश्न, सामान्य लोकांच्या समस्या अश्या प्रश्नाकरिता आपण विधानसभेत आलो असे त्यांनी सांगितले आहे. या अगोदर त्यांच्या कडे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे पद नव्हते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *