कोन बनेगा करोडपती मधील पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथे सध्या काय करतोय ?

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला करोडपती म्हणजे, हर्षवर्धन नवाथे आहे. २००० मध्ये जेव्हा कोन बनेगा करोडपति हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा या कार्यक्रमात पहिला करोडपती ठरला एक मराठी माणुस हर्षवर्धन नवाथे. आज या घटनेला १७ वर्ष झाले चला आज खासरेवर बघुया सद्या हर्षवर्धन नवाथे काय करतात..

तो प्रश्न होता १ करोड रुपयाचा , भारतीय राज्यघटनेनुसार संसदिय कामकाजात खालील पैकी कोणाला भाग घेण्याचा अधिकार आहे ? आणि पर्याय होते A. Solicitor General B. Attorney General C. Cabinet Secretary D. Chief Justice हर्षवर्धनने ॲटर्नि जनरल हे योग्य उत्तर देऊन पहिला रिॲलीटी शोचा करोडपती होण्याचा मान मिळवला.

हर्षवर्धन कोन बनेगा करोडपती जिंकला तेव्हा त्याचे वय होते फक्त २७ वर्ष, त्याला IAS,IPS होण्याची ईच्छा होती. हर्षवर्धनचे वडिल सिबीआय अधिकारी त्यामुळे तो पोलीस व्हायचे स्वप्न बघायचा. परंतु करोडपती झाल्यावर त्याचे आयपष्य पालटुन गेले. तो एका रात्रीतुन स्टार झाला. त्याला प्रसिध्दी मिळाली अनेक लोक त्याला पार्टि कार्यक्रमात बोलवु लागले. जाॅन अब्राहम त्याचा चांगला मित्र झाला.

या सर्व गोष्टिमुळे तो अभ्यासापासुन दुर गेला आणि परिक्षेच वय ही निघुन गेले. त्यानंतर हर्षवर्धनने एमबिएचे शिक्षण पुर्ण केले. पुणे येथे सिंबाॅयसिस येथुन शिक्षण घेत असताना प्रसिध्दीने त्याची पाठ सोडली नाही. त्यामुळे पुढील शिक्षणाकरीता इंग्लड येथील नेपियर युनिवर्सिटीमध्ये एमबीए करीता प्रवेश घेतला

केबिसी मिळालेल्या एक करोड रुपयाचे बक्षिस हर्षवर्धन यांनी पुर्ण बॅंकेत जमा केले. त्याला एक करोड रुपयावर ३० लाख रुपये टैक्स भरावा लागला होता. त्या पैस्यामध्ये त्याने फक्त ६ लाख रुपये किमतीची मारुती एस्टिम Vx ही गाडी विकत घेतली व काही पैसा शिक्षणाकरीता खर्च केला.

केबीसी जिंकल्यानंतर तो आठवणी सांगतो की, त्याला एका हाॅटेलमध्ये १० दिवस ओळख बदलुन ठेवल्या गेले. कार्यक्रमाचे प्रसारण होण्या अगोदर ही गोष्ट लोकांना माहिती पडु नये याकरीता ही उठाठेव करण्यात आली होती. सध्या तो महिंद्रा & महिंद्रा कंपनीमध्ये सीएसआर & एथिक्स डिपारमेन्टचा हेड आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन 2007 साली रेशीमगाठीत अडकला.हर्षवर्धनचे 29 एप्रिल 2007 रोजी सारिका नीलत्करसोबत लग्न झाले. सारिका ही मराठी अभिनेत्री असून तिनं मराठी सिनेमा, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे.

‘चाणक्य’, ‘जास्वंदी’ या नाटकांत सारिकानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दूरदर्शनवरील ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. 2012 मध्ये आलेल्या अजिंक्य या सिनेमातही सारिका झळकली होती. ‘पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर’ या सिनेमात सारिकाने अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं होतं. तर 2008मध्ये संदीप कुलकर्णींसह ‘एक डाव संसाराचा’ या सिनेमातही काम करण्याची संधी सारिकाला लाभली.

सारिका आणि हर्षवर्धन यांचे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. कुठल्याही फिल्मी पार्टीत त्यांची भेट झाली नव्हती. आईवडिलांनी निवडलेल्या मुलीसोबत हर्षवर्धन यांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचं नाव सारांश तर दुस-याचं रेयांश असं आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *