छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला किती मतं मिळाली?

छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमने नगरमधून मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली. श्रीपाद छिंदम हा नगरचा भाजपचा माजी उपमहापौर आहे. उपमहापौर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती.

त्याला त्यावेळी उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर कोणत्याही पक्षाने उमेदवार न दिल्याने त्याने अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तो यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला.

मायावतींच्या बहुजन समाज पक्ष अर्थात बसपाने श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून उमेदवारी दिली. अहमदनगर शहर मतदारसंघातून श्रीपाद छिंदम राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान-

श्रीपाद छिंदम हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लिल शब्द वापरुन आक्षेपार्ह बरळला होता. त्यावेळी सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवप्रेमींनी छिंदमला चोपही दिला होता. सुरक्षेसाठी नगरमधून छिंदमला तडीपार करण्यात आले होते. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय झाला.

बसपाने दिले विधानसभेचे तिकीट-

डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदगनर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छिंदम अपक्ष म्हणून लढला. विशेष म्हणजे छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून एक हजार ९७० मतांनी अपक्ष म्हणून निवडूनही आला.

आता या विधानसभा निवडणुकीत छिंदम किती मत घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. विधानसभेला त्याला अपयश मिळाले असून त्याला खूप कमी मत मिळाले आहेत. छिंदमचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ २ हजार ९२३ मते मिळाली आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम देशमुख दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या जगताप यांना एकूण ८१ हजार २३१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या राठोड यांना ७० हजार ७८ मते मिळाली आहेत. जगताप यांनी ११ हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *