उदयनराजेंविरूद्ध लढलेल्या अभिजित बिचकुलेच्या पत्नीला मिळाली त्याच्यापेक्षा जास्त मतं!

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉस मराठी सीजन २’ मुळे अभिजित बिचुकले हे नाव अधिक चर्चेत आले आणि याच गोष्टीचा फायदा घेत अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदार संघातून थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. साताऱ्याचे असलेल्या बिचुकले यांनी पोलिसांनी बिग बॉसच्या घरामधूनच अटक केली होती. महिनाभर कोठडीत राहिल्यानंतर अभिजित यांची पुन्हा बिग बॉस हाऊसमध्ये एन्ट्री झाली होती.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले बिचुकले सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण गेली काही वर्षं ते राजकारणात नशीब आजमावताना दिसत आहेत. २००४पासून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आतापर्यंत नगरपालिका ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं आहे. सातारा शहरात गुरुवार पेठ परिसरात पत्र्याच्या छोट्याशा घरात बिचुकले राहतात.

अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं नाही. पण निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. या हि निवडणुकीत आदित्य विरोधात अभिजित बिचुकले यांची जादू काही चालली नाही आणि त्यांना आदित्य ठाकरे विरोधात वरळी मतदार संघातून अपक्ष अभिजित बिचुकले यांना ७७६ एवढे मते मिळालेली आहे.

पत्नी लढली उदयनराजे विरोधात लोकसभा-

पत्नी अलंकृता बिचुकले या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे विरोधात स्वतः बिचकुले यांनी निवडणूक लढवली होती. तर पत्नीला त्यावेळी सांगलीमधून उभा केले होते. सांगलीतील अर्ज भरताना डिपॉजिट म्हणून त्यांनी चक्क साडेबारा हजार रुपयांची चिल्लर देऊन अधिकाऱ्यांना घाम फोडला होता.

साताऱ्याच्या राजकारणात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शब्द अंतिम असला तरी त्यांचा बिचुकले त्यांचा विरोध करताना दिसतात. त्यावर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी आपण फक्त बिचुकले यांना घाबरतो अशी मिश्कील टिप्पणी केली होती.

बिचुकले यांची पत्नी अलंकृता या शिक्षिका आहेत. त्यांना उदयनराजेंविरोधात पोटनिवडणुकीत १६४५ मते मिळाली आहेत. या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *