आता या एकाच घरांमध्ये आहेत खासदार आणि आमदार दोन्हीही

२०१९ हे वर्ष लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वर्ष ठरले. दोन्ही निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचे धक्के बसले तर अनेक नवखे उमेदवार लोकप्रतीनिधी म्हणुन निवडून गेले. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार झालेल्या अनेकांच्या घरातीलच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उभे होते.

त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाल्यामुळे अशा उमेदवारांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. अशा एकाच घरात खासदार आणि आमदार असणाऱ्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत…

१) शरद पवार – सुप्रिया सुळे – अजित पवार – रोहित पवार :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत, तर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे विक्रमी मतांनी आमदार म्हणुन निवडून आले आहेत. लक्षवेधी ठरलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे आमदार म्हणुन निवडून आले आहेत.

२) नारायण राणे – नितेश राणे :

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर तिथून भाजपच्या पाठिंब्यावर ते राज्यसभा खासदार झाले. आताच्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपमधून नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून विजय मिळवत आमदार म्हणून स्थान मिळवले आहे.

३) एकनाथ शिंदे – श्रीकांत शिंदे :

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभेला आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घेतली, त्यात श्रीकांत शिंदेंचा विजय झाला आणि ते खासदार बनले. एकनाथ शिंदे स्वतः कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

४) राधाकृष्ण विखे पाटील – सुजय विखे पाटील :

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे पाटील याला लोकसभेवेळी तिकीट मिळाले नसल्यामुळे सुजयने भाजपमध्ये प्रवेश करून अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात सुजय विखे खासदार म्हणून निवडून आले. राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

५) रावसाहेब दानवे – संतोष दानवे :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले रसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत तर त्यांचा मुलगा संतोष दानवे हे भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आमदार बनले आहेत. ६) बाळू धानोरकर – प्रतिभा धानोरकर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकमेव खासदार म्हणून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी वरोरा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

६) नवनीत राणा – रवी राणा :

अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभ्या असणाऱ्या नवनीत राणा कौर या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून नवनीत राणांचे पती रवी राणा निवडून आले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *