बोटावरची शाई घालवण्यासाठी हे उपाय करा

निवडणूक म्हणलं की मतदान आलं आणि मतदान म्हणलं की बोटांना शाई आली. लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सहभागी झाल्याचे दाखवण्यासाठी अनेकजण अभिमानाने बोटाला शाई लावून घेतात. फेसबुक, व्हाट्सअपला अभिमानाने शेअर करतात. नवख्या उमेदवारांना तर याचे फार कुतूहल असते.

परंतु निवडणूक झाल्यानंतर ही शाई अनेक दिवस जात नाही. नंतर नंतर नाईलाजाने तशीच शाई असणारे बोट घेऊन मिरवावे लागते याचे अनेकांना वाईट वाटते. आज आम्ही बोटाला लावलेली शाई घालवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत…

बोटाची न जाणारी शाई कशी आणि कुठून आली ?

मतदानानंतर बोटाला लावायची शाई भारताचे प्रथम मुख्य निवडणुक आयुक्त सुकुमार सेन यांनी प्रचलित केली. दक्षिण भारतातील म्हैसुर पेन्ट अँड वॉर्निश लि. या कंपनीत ही शाई बनवली जाते. ही शाई बाजारामध्ये विक्रीला ठेवली जात नाही. केवळ निवडणुकीतच ही शाई वापरण्यात येते.

या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट हे केमिकल वापरण्यात आलेले असल्यामुळे किमान ३ दिवस ही शाई निघत नाही. पाण्याने ही शाई धुण्याचा प्रयत्न केल्यास तिला अजूनच गडद रंग प्राप्त होतो. माणसाच्या शरीराशी या शाईचा संबंध आल्यास त्वचे वरील क्षार आणि शाईचा संयोग होऊन सिल्व्हर क्लोराइडमध्ये त्याचे रूपांतर होते.

बोटाला लागलेली शाई कशी काढावी ?

मतदान झाल्यानंतर गुगलवर अचानकपणे “How to remove vote ink” असे सर्चचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच लोक बोटाची शाई काढण्याचे उपाय शोधात आहेत. बोटाची शाई काढण्याचे काही थोडं उपाय अद्याप सापडले नाहीत. पण खासरे तर्फे त्यांच्यासाठी काही उपाय देत आहोत. टूथपेस्टचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, नेल पॉलिश रिमूवरचा वापर करणे, काडेपेटीतील काडीचा वापर करणे असे काही काही उपाय गुगलवर देण्यात आले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *