भाजपला मोठा धक्का या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा झाला पराभव..

शहरातील ८ पैकी ८ जागांवर विजय मिळवून मागील विधानसभा निवडणुकीत पुणे शहराला आपला बालेकिल्ला बनवलेल्या भाजपची या निवडणुकीत धाकधूक वाढली आहे. सध्या ८ पैकी ५ विधासभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली आहे. तर ३ मतदारसंघात महाआघाडी जोरात आहे.

भाजपा साठी हि निवडणूक धक्कादायक आहे कारण मोठ मोठे त्यांचे नेते माघार घेत आहे. विजयापासून त्यांना लांब ठेवण्यात कॉंग्रेस एनसीपी यशस्वी ठरलेली दिसत आहे. पुणे मध्ये कॉंगेस आणि एनसीपी परत आपल्या जागा वाढवण्यात यशस्वी ठरले आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी दणदणीत विजय मिळवला असल्याचं वृत्त आल आहे. पुण्यात गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने यावेळेस पुण्यात खात उघडल आहे. योगेश टिळेकर हे भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आहे.

हडपसर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 3 हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. मतदार संघात तिरंगी लढत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे यांच्या उमेदवारीने हडपसर मतदार संघात चांगलीच रंगत आली होती.

दरम्यान राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या योगेश टिळेकर यांनी 82 हजार 629 एवढी मते घेत विजय मिळवला. हडपसर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे महादेव बाबर होते. त्यांना 52 हजार 381 मते मिळाली. आणि त्यांचा 30 हजार 248 मतांनी पराभव झाला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे हे तिसऱ्या क्रमांकावर होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *