नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी काय निकाल लागला एकदा बघाच..

यंदाच्या निवडणुकीत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकूण ९ सभा घेतल्या होत्या. परळीमधील सभा तर त्यांची चर्चेत राहली होती कारण इथे एकच डायलॉग चालत होता इथे सीएम येओ का पीएम येणार फक्त डीएम (धनंजय मुंडे) त्यामुळे हि ठिकाण देखील चर्चेत राहले. परंतु उर्वरित महाराष्ट्रात काय झाले बघूया.

सर्वात पहिले परळी पासून सुरवात करूया आणि इथला निकाल सर्वाना माहिती आहे. परळी मध्ये पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे आणि आपला सात वर्षाचा लढा त्यांनी विजयी स्वरुपात साजरा केला आहे. एकमेकावर टीका टिपणी करिता येथील निवडणूक गाजली होती.

यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मोदींनी एकूण नऊ सभा घेतल्या. यामध्ये जळगाव, सातारा, परळी, मुंबई (वांद्रे), खारघर, पुणे, परतूर, अकोला, भंडारा यांचा समावेश होता. स्वतः पंतप्रधानांनी साताऱ्यात सभा घेत उदयनराजेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही साताऱ्याची जागा प्रतिष्ठेची केली.

आणि इथे उदयनराजे यांचा पराभव करत श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहे. शेवटची पावसात झालेली सभा, त्यात पवारांनी भिजत केलेले भाषण व उदयनराजेंना खासदार करून आपण चूक केली होती व ती सुधारण्यासाठी आलो आहे, हे आव्हान हवा फिरवणारे ठरले.

मोदींनी जळगावात घेतलेली सभा युतीच्या उमेदवारांसाठी फायद्याची ठरली असली, तरी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांना विजयाने हुलकावणी दिली आहे. विदर्भामध्येही मोदींनी अकोला आणि भंडारा अशा दोन सभा घेतल्या, मात्र लोकसभेमध्ये युतीचा बालेकिल्ला ठरलेला हा भाग यावेळी कमी पडला.

पुणे युतीचा बालेकिल्ला आहे व येथील आठही आमदार युतीचेच होते. मोदींच्या सभेनंतर हे यश पलटलेले दिसत आहे. तर आता पुणे मध्ये ६ आमदार हे युतीचे आणि २ आमदार हे आघाडीचे आले आहे.

मुंबईमध्ये मोदी व उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली आणि मुंबई व कोकणाने युतीला पुन्हा सत्ता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या पदरी अपयश आले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *